नेदरलँड क्रिकेट संघासाठी गुरुवार (6 जुलै) ऐतिहासिक ठरला. वनडे विश्वचषक 2023 साठीच्या क्वॉलिफायर सामन्यांमध्ये गुरुवारी नेदरलँडने स्कॉटलँडविरुद्ध 4 विकेट्सने विजय मिळवला. नेदरलँडसाठी हा सामना निर्णायक असून विजयानंतर संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. क्वॉलिफायर सामन्यांतील सुपर सिंक्स फेरीचा हा आठवा सामना होता. बास डी लीड याने जबरदस्त प्रदर्शन करून नेदरलँडला विश्वचषकात स्थान मिळवून दिले. यासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देखील दिला गेला.
नेदरलँडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलँड संघाने 50 षटकांमध्ये 9 बाद 277 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडने 42.5 षटकांमध्ये हे लक्ष्य गाठले. 6 विकेट्सच्या नुकसानावर 278 धावा करून नेदरलँड संघ विजय ठरला आणि विश्वचषकासाठी पात्र ठरणारा 10 वा संघ ठरला. त्याआधी क्वॉलिफायर सामन्यांमध्ये खेळून श्रीलंकन संघाने विश्वचषकासाठी जागा पक्की केली होती. बास डी लीड (Bas De Leede) नेदरलँडसाठी मॅच विनर ठरला. त्याने प्रथम गोलंदाजी करताना 10 षटकात 52 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजाच्या रूपात 92 चेंडूत 123 धावांची वादळी खेळी केली. या अष्टपैलू प्रदर्शनामुळेच नेदरलँड संघासाठी विजय सोपा झाला.
बास डी लीड याचे आतापर्यंतचे हे सर्वोत्तम प्रदर्शन राहिले आहे. तो वनडे क्रिकेटमध्ये एका सामन्यात पाच विकेट्स आणि शतक करणारा केवळ चौथा खेळाडू ठरला आहे. बास डी लीड याने नेदरलँडसाठी आतापर्यंत 29 वनडे आणि 31 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या दोन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या नावापुढे अनुक्रमे 642 आणि 610 धावांची नोंद आहे. गोलंदाजाच्या रुपात त्याने वनडे क्रिकेटमध्ये 19, तर टी-20 क्रिकेटमध्ये 27 विकेट्स घेतल्या आहेत.
बास डी लीड याला क्रिकेट खेळण्यासाठी कौटुंबीक वासरा लावला, असे म्हणता येईल. कारण त्याचे वडील देखील नेदरलँडचे दिग्गज खेळाडू राहिले आहेत. बास डी लीड याचे वडील टिम डी लीड (Tim De Leede) यांनी नेदरलँड संघासाठी 1996, 2003 आणि 2007 सालचे विश्वचषक खेळल्या आहेत. आता मुलगा बास डी लीड 2023 विश्वचषका नेदरलँड संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. मुलाप्रमाणे वडील टिम डी लीड यांनी एका सामन्याच भारताविरुद्ध 4 विकेट्स घेतल्या होत्या. यात सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या दोघांच्या विकेट्सही होत्या. (Bas De Leede scored the match-winner for the Netherlands in the decisive World Cup qualifier)
महत्वाच्या बातम्या –
Big Breaking: विश्वचषकासाठी नेदरलँड क्वालिफाय! निर्णायक सामन्यात स्कॉटलंडला चारली पराभवाची धूळ
सामन्यातील असामान्य नेतृत्व! जबरदस्त आहे कसोटी, वनडे आणि टी-20 क्रिकेटमधील धोनीची आकडेवारी