एनबीए: एनबीएमध्ये लेब्रॉन जेम्स, केविन डुरंट, स्टीफन करी, हे जरी सर्वात उत्कृष्ट खेळाडू असले तरी मागील दोन आठवड्यात या पाच खेळाडूंची कामगिरी उत्तम आहे.
क्लीवलैंड कैवलियर्स या संघाने मागील दोन आठवड्यात ४ सामन्यांपैकी ३ सामने गमावले आहेत, तर फक्त १ सामना जिंकलेले आहेत.
बोस्टन केल्टिक्स, गोल्डन स्टेट वारियर्स संघाने मागील ४ सामन्यांपैकी सलग ३ सामने जिंकले. ह्यूस्टन रॉकेट्स, ला क्लीपर्स, न एंटोनियो स्पर्स या संघानी सर्वच सामने गमावलेले आहेत.
या आठवड्यातील एनबीएमधील सर्वोत्तम खेळाडू:
# एल होर्फोर्ड
एल होर्फोर्ड संघामध्ये मध्यभागी खेळत असून बोस्टन केल्टिक्स संघात खेळतो. बोस्टन केल्टिक्स संघाचा मागील सामना मिल्वौकी बक्स या संघासोबत होता. या सामन्यात एल होर्फोर्डने ३४ मिनिटात २७ गुण, ९ रिबॉउंड आणि ४ असिस्ट घेतल्या. बोस्टन केल्टिक्स संघाने हा सामना ९६ गुणांनी जिंकला.
# डेमैकस
डेमैकस न्यू ऑरलियन्स पेलिकन संघाचा खेळाडू असून, या संघाचा मागील सामना सैक्रामेंटो किंग्स या संघाबरोबर होता. या सामन्यात डेमैकसचे ४१ गुण, २३ रिबॉउंड तर ६ असिस्ट होत्या. तसेच क्लीवलैंड कैवलियर्स संघाबरोबरच्या सामन्यात डेमैकसचे २९ गुण, १२ रिबॉउंड, १० असिस्ट होत्या. हा सामना न्यू ऑरलियन्स पेलिकन संघ १२३ गुणांनी जिंकला.
# ग्यानीस एंटेटोकॉन्म्पो
ग्यानीस एंटेटोकॉन्म्पो हा मिल्वौकी बक्स संघाचा खेळाडू आहे. ग्यानीस एंटेटोकॉन्म्पो संघाचे मागील आठवड्यात झालेल्या ऐकून सामन्यातील सरासरी गुण ३१.० आहे. तर ११.७ रिबॉउंड व ६ असिस्ट आहेत. मिल्वौकी बक्स संघाचा मागील सामना क्लीवलैंड कैवलियर्स संघाबरोबर होता हा सामना बक्स ९१-११० गुणांनी हरली.
# विक्टर ओलाडिपो
विक्टर ओलाडिपो इंडियाना पैकर्स संघात खेळत असून संघात तो शूटिंग गार्ड म्हणून खेळतो. विक्टर ओलाडिपोचे मागील आठवड्यातील सरासरी गुण २८.६ आहेत तर ४.६ रिबॉउंड, २.६ असिस्ट आहेत. इंडियाना पैकर्स संघाचा मागील सामना सैन एंटोनियो स्पर्स संघाबरोबर होता. या सामन्यात विक्टर ओलाडिपोने २३ गुण, ५ रिबॉउंड, ४ असिस्ट मिळविल्या. हा सामना इंडियाना पैकर्स संघाने ९७-९४ ने जिंकला.
# जेम्स हार्डन
जेम्स हार्डन ह्यूस्टन रॉकेट्स संघात खेळत असून संघामध्ये तो पॉईंट गार्ड म्हणून आहे.मागील आठवड्यातील सरासरी गुण २४.५ गुण असून ५.५ रिबॉउंड व १०.० असिस्ट आहेत. ह्यूस्टन रॉकेट्स संघाचा मागील सामना फिलाडेल्फिया 76 इरा संघासोबत होता हा सामना ह्यूस्टन रॉकेट्स संघ १०७-११० गुणांनी हरला.