आजपर्यंत आपण क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक विक्रम झाल्याचे पाहिले आहे. एवढंच काय, तर एका षटकात 6 षटकार मारण्याचा विक्रमही आपण ‘याची देही याची डोळा’ पाहिला आहे. एका षटकात 6 षटकार मारून 36 धावा किंवा एखादा वाईड मिळालाच, तर 37 धावाही होताना पाहिलं आहे. मात्र, एका षटकात 46 धावा बनल्या आहेत, असं म्हटलं तर कदाचित कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण असं झालंय. क्रिकेट खेळताना असा एक विक्रम झाला आहे, जो पाहून भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका स्पर्धेदरम्यान एका षटकात फलंदाजाने 46 धावा चोपल्या. आता या षटकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
झालं असं की, केसीसी फ्रेंडी मोबाईल टी20 चॅम्पियन्स ट्रॉफी (KCC Friendy Mobile T20 Champions Trophy) स्पर्धेत बुधवारी (दि. 3 मे) एनसीएम इन्व्हेस्टमेंट आणि टॅली सीसी संघात एक सामना खेळला गेला. या सामन्यात एनसीएमआय प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. यावेळी डावाच्या 15व्या षटकात असे काही झाले, ज्याची कुणीही कल्पना केली नव्हती.
षटकाच्या पहिल्या चेंडूत हरमन सिंग साहनी याने षटकार मारला. हा नो-बॉल होता. यानंतर फ्री हिट मिळाला आणि बॅटला चेंडू न लागताच चौकाराच्या दिशेने गेला. षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने षटकार मारला. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा नो-बॉल टाकला, त्यावर फलंदाजाने षटकार मारला. यानंतर मिळालेल्या फ्री-हिटवर फलंदाजाने खणखणीत षटकार खेचला.
षटकातील चौथ्या चेंडूवर हरमनने मिड ऑनकडे षटकार मारला. तसेच, पाचव्या चेंडूवर मिडविकेटच्या दिशेने षटकार मारला. षटकातील अखेरच्या चेंडूवर त्याने फाईन लेगच्या दिशेने चौकार मारला आणि अशाप्रकारे एका षटकात फलंदाज हरमन सिंगने 46 धावा केल्या. हा व्हिडिओ फॅन कोडने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, “एक षटकात 46 धावा करणे शक्य नाहीये ना? बरोबर? चूक? आता हे पाहा.”
Getting 46 runs in an over is not possible right? Right? Wrong! Watch this absolute bonkers over now.
.
.#KCCT20 pic.twitter.com/PFRRivh0Ae— FanCode (@FanCode) May 3, 2023
हा व्हिडिओ पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. चाहत्यांनी म्हटले आहे की, हा तर एक विक्रम झाला आहे. हे पाहून त्यांना विश्वासच बसत नाहीये. आणखी एका युजरने लिहिले की, असे क्रिकेट पाहून डोकं फिरायला लागलंय.
खरं तर, या सामन्यात एनसीएमआयने 20 षटकात 6 विकेट्स गमावत 282 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना टीसीसी संघाला सर्वबाद फक्त 66 धावाच करता आल्या. तसेच, हा सामना एनसीएमआय संघाने 216 धावांनी जिंकला. (batsman scored 46 run in an over during this match know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL संघांनो सावधान! 2 वर्ल्डकप जिंकणारा खेळाडू होणार KKRच्या ताफ्यात सामील, कोण आहे तो?
‘तो फक्त दिसायलाच छोटाये, पण…’, मॅचविनर पठ्ठ्यासाठी रोहितने उधळली स्तुतीसुमने