जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना संपल्यानंतर सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष पाकिस्तान सुपर लीगच्या अंतिम सामन्याकडे होते. पीएसएलचा अंतिम सामना हा मुलतान सुलतान विरुद्ध पेशावर झालमी यांच्यात झाला होता. मुलतान सुलतानने पेशावर झालमीला ४७ धावांनी हरवत पहिलेवहिले जेतेपद पटकावले. दरम्यान पेशावर झालमीच्या एका गोलंदाजाने अप्रतिम विकेट घेत सर्वांचे लक्ष वेधले.
पीएसएलच्या ६ व्या मोसमातील अंतिम सामन्यात मुलतान सुलतान संघाने चांगली सुरुवात करत ८.४ षटकांत फक्त १ गडी गमावत ६८ धावा केल्या होत्या. पेशावर झालमीच्या गोलंदाजाना या महत्त्वाच्या सामन्यात शान मसूद आणि कर्णधार मोहम्मद रिझवान यांची भागीदारी तोडण्याची गरज होती. अशा परिस्थितीत गोलंदाज मोहम्मद इम्रानने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन करत सलामीवीर शान मसूदचा त्रिफळा उडवला.
आठव्या षटकातील चौथ्या चेंडूवर गोलंदाजी करायला आलेल्या मोहम्मद इम्रानने जोरदार गतीचा चेंडू फेकला. आत्मविश्वासाने शान मसूदने या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु वेगवान चेंडूने त्याचा ऑफ स्टंप उडाला. हे दृश्य पाहून शान स्तब्ध झाला होता.
इमरानच्या या शानदार गोलंदाजीमुळे पेशावर झालमीच्या गोलंदाजाना मोठी विकेट मिळाली. यानंतर अकराव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर कामरान अकमलच्या हातून मोहम्मद इम्रानने ३० धावांवर कर्णधार मोहम्मद रिझवानला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अशाप्रकारे ही सलामी जोडी ११ षटकांत पव्हेलियनला परतली.
Light up light up💡@shani_official bails go red as @realmimran14pk finally breaks the partnership.#HBLPSL6 | #MatchDikhao | #MSvPZ pic.twitter.com/jYqQ4UBG1a
— PakistanSuperLeague (@thePSLt20) June 24, 2021
या सामन्याचा ‘सामनावीर’ म्हणून शोऐब मकसूदला निवडण्यात आले आणि त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ही त्याला देण्यात आले. त्याने अंतिम सामन्यात ६५ धावा केल्या व संघाच्या विजयात मोलाचा वाटा दिला. मुलतान सुलतानकडून इम्रान ताहीरने संघासाठी ३ बळीही घेतले .
महत्वाच्या बातम्या
ये तो होना ही था! भारताचा पराभवानंतर मांजरेकरांनी जडेजावर साधला निशाणा, पाहा काय म्हणाले
लवकरच तुटणार कोहली-शास्त्रींची जोडगोळी, ‘या’ टूर्नामेंटमधील कामगिरीवर ठरणार भवितव्य