---Advertisement---

असे २ भारतीय फलंदाज, ज्यांनी वयाची २१ वर्षे पूर्ण करण्याआधीच आयपीएलमध्ये ठोकलेत सर्वाधिक अर्धशतके

On: सोमवार, सप्टेंबर 28, 2020 7:53 AM
---Advertisement---

आयपीएल स्पर्धेने युवा खेळाडूंना प्राधान्य मिळाले. दरवर्षी युवा आणि अनुभवी खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात आणि ते त्यांचा जबरदस्त खेळ दाखवतात. येथे प्रत्येक खेळाडूला भरपूर संधी मिळते. खेळाडू आयपीएलमध्ये सर्वोत्कृष्ट खेळ दाखवून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करतात, तसेच राष्ट्रीय निवडकर्त्यांचे लक्ष देखील वेधून घेतात.

अनुभवी खेळाडूंसह खेळल्याने युवा खेळाडूंना प्रेरणा आणि शिकवण दोन्ही मिळते. युवा खेळाडू सराव पासून ते ड्रेसिंग पर्यंत तसेच मैदानावर खेळण्यापर्यंत वरिष्ठ खेळाडूंसोबत असतात. प्रत्येक नवीन खेळाडू त्यांच्याकडून काहीतरी शिकत असतो. यामुळेच आयपीएलमध्ये येणाऱ्याअनेक नवीन खेळाडूंनी राष्ट्रीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील खेळले आहे.

सध्या भारतीय क्रिकेटमध्ये अशी अनेक नावे आहेत, आयपीएलमधून राष्ट्रीय संघात सामील झाली. यातील अनेकांनी आपल्या खेळीनी सर्वांना प्रभावित केले आहे. आपण या लेखात अशा २ खेळाडूंचा उल्लेख करत आहोत ज्यांनी आयपीएलमध्ये वयाची २१ वर्षे पूर्ण करण्याआधी सर्वाधिक अर्धशतके ठोकली..

या २ फलंदाजानी वयाच्या २१ वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये ठोकलेत सर्वाधिक वेळा अर्धशतक

२. पृथ्वी शॉ

१९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ एक प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्याकडे असलेल्या फलंदाजी कौशल्याची नेहमीच चर्चा होते. म्हणूनच लहान वयातच तो आयपीएल आणि भारतीय संघ या दोन्ही संघात खेळत आहे. २० वर्षीय शॉने आयपीएलमध्ये आतापर्यंत २७ सामने खेळले असून त्यात त्याने त्याच्या फलंदाजीतुन ५ अर्धशतके झळकावली आहेत.

दिल्ली कॅपिटलसाठी खेळणारा पृथ्वी शॉ अवघ्या वीस वर्षांचा आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल या दोन्हीमध्ये त्याला अजून लांब पल्ला गाठायचा आहे.

रिषभ पंत

रिषभ पंत हा धडाकेबाज फलंदाज दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये खेळत आहे. पंतमध्येही प्रतिभेची कमतरता नाही परंतु तो कधीकधी काही टाळता येणाऱ्या चुका करतो. पंत अजूनही २२ वर्षांचा आहे परंतु वयाची २१ वर्षे पूर्ण करण्याआधी त्याने त्याच्या फलंदाजीतून आयपीएलमध्ये तब्बल ९ अर्धशतके झळकावली होती. वादळी खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या या फलंदाजाचे आयपीएलमध्ये शतकही आहे. तसेच कमी वयातच पंतने भारताच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघाकडून पदार्पण केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---