आगामी वनडे विश्वचषकाला अवघे काही तास बाकी आहेत. 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाचा पहिला सामना खेळला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर विश्वचषकातील वेगवेगळ्या विक्रमांची चर्चा सध्या होताना दिसते. विश्वचषकात सर्वोत्तम प्रदर्शन करणारे विक्रम चर्चेत आहेत. पण आपण या लेखात असा एक विक्रम पाहणार आहोत, ज्यामध्ये विश्वचषकात सर्वाधिक वेळा एक धाव करून बाद होणाऱ्यांचा विचार केला गेला आहे.
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) चा पहिला सामना गुरुवारी (5 ऑक्टोबर) इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 19 ऑक्टोबर रोजी आयोजित केला गेला आहे. विश्वचषकातील सर्वात यशस्वी फलंदाजाचा विचार केला, तर यादीत पहिला क्रमांका भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा येतो. पण फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकरला न जमलेला एक खास विक्रम श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याने विश्वचषक स्पर्धेत केला आहे. मलिंगा वनडे विश्वचषकात सर्वाधिक वेळा एक धाव करून बाद झाला आहे. त्याने ही नकोशी कामगिरी वनडे विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक चार वेळा केली आहे.
विश्वचषकात चार वेळा एक धाव करून तंबूत परतणाऱ्यांमध्ये मलिंगासोबत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम (Wasim Akram) आणि बास झुईडरेंट (Bas Zuiderant) हे दोघेही आहेत. पण वसीम अक्रम आणि बास झुईडरेंट यांनी विश्वचषकातील या चार डावांपैकी एका डावात विकेट गमावली नव्हती. हे दोघेही प्रत्येकी एक-एक वेला नाबात एक धाव करून तंबूत परतले होते. मलिंगाच्या बाबतीत मात्र असे झाले नाहीये. मलिंगा चार पैकी एकदाही नाबात तंबूत परतू शकला नाही. (Batsmen who have been dismissed for one run most times in the World Cup)
वनडे विश्वचषकात सर्वाधिक वेळा एक धाव करून तंबूत परतणारे खेळाडू
लसिथ मलिंगा – 4 (सर्वोत्तम धावसंख्या – 1)
वसीम अक्रम – 4 (सर्वोत्तम धावसंख्या – 1*)
बास झुईडरेंट – 4 (सर्वोत्तम धावसंख्या – 1*)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! इराणी कप 2023 रेस्ट ऑफ इंडियाच्या नावावर, सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी सौराष्ट्रने टेकले गुडघे
Asian Games 2023 । भारताचे अजून एक पदक निश्चित, अभय आणि अनाहतची स्क्वॉश दुहेरीत चमकदार कामगिरी