Most ODI centuries in a calendar year: वनडे क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके करण्याचा रेकाॅर्ड ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने हा रेकाॅर्ड आजपासून 27 वर्षांपूर्वी केला होता. गेल्या 27 वर्षांपासून सचिनचा हा रेकाॅर्ड कोणीही मोडू शकलं नाही. या यादीत पहिल्या 5 मध्ये 4 भारतीय खेळाडू आणि 1 ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे. (Highest ODI centuries in one year)
एका कॅलेंडर वर्षात वनडेमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारे 5 फलंदाज
5) विराट कोहली- विराट कोहली 6 शतकांसह या यादीत पाचव्या स्थानावर आहे. विराटने 2017 साली 26 सामन्यांमध्ये 76.84च्या सरासरीने 1,460 धावा केल्या होत्या, ज्यात 6 शतकांचा समावेश होता. (Virat Kohli 2017 record)
4) डेव्हिड वॉर्नर- ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर या यादीत चौथ्या स्थानावर आहे. वॉर्नरने 2016 साली वनडेमध्ये 7 शतके झळकावली होती. या काळात त्याने 63.09च्या सरासरीने 1,388 धावा केल्या होत्या. (David Warner ODI centuries)
3) रोहित शर्मा- भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माचे नावही या यादीत आहे. रोहितने 2019 साली एकूण 7 शतके ठोकली होती. 28 सामन्यांमध्ये त्याने 57.31च्या सरासरीने 1,490 धावा कुटल्या होत्या. (Rohit Sharma 2019 ODI stats)
2) सौरव गांगुली- भारतीय दिग्गज फलंदाज सौरव गांगुली (Sourav Ganguly) या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. गांगुलीने 2000 साली 32 सामन्यांमध्ये 7 शतके झळकावली होती. या काळात त्याने 56.39च्या सरासरीने 1,579 धावा केल्या होत्या.
1) सचिन तेंडुलकर- भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर या यादीत सर्वात पुढे आहे. सचिनने 1998 साली 34 सामन्यांमध्ये 9 शतके ठोकली होती. या काळात त्याने 102.16च्या स्ट्राईक रेटने 1,894 धावा केल्या होत्या. (Sachin Tendulkar ODI record)





