येत्या १८ ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा रोमांचक सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य दिले आहे. या सामन्यात भारतीय संघ हा सामना जिंकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण भारतीय संघ एक मजबूत संघ म्हणून दिसून येत आहे. ही स्पर्धा दोन्ही संघासाठी तितकीच महत्वाची आहे.
तसेच हा सामना विराट कोहली विरुद्ध केन विलियमसन असाही असू शकतो. दोघेही उत्कृष्ट फलंदाज आहेत. चला तर पाहूया, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील या दोघांची कामगिरी.
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचण्यासाठी विराट कोहली आणि केन विलियमसन यांनी मोलाची भुमिका बजावली आहे. भारतीय कर्णधाराने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत १४ सामने खेळले आहेत. यात त्याला ४३.८५ च्या सरासरीने एकूण ८७७ धावा करण्यात यश आले आहे. यामध्ये २ शतकांचा समावेश आहे. हे शतक विराटने दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश संघाविरुद्ध झळकावले होते. तसेच विराटला २०१९ नंतर आतापर्यंत शतक झळकवता आले नाहीये. त्यामुळे शतकाची प्रतिक्षा संपवण्यासाठी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत विराटकडे चांगली संधी असणार आहे.
तसेच न्यूझीलंड संघाचा कर्णधार विलियमसन याची आकडेवारी पाहिली तर ती विराटपेक्षा कमी आहे. परंतु विलियमसनने अवघे ९ सामने खेळले आहेत. या ९ सामन्यात विलियमसनच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला आहे. त्याने ५८.३५ च्या सरासरीने ८१७ धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतकांचा समावेश आहे. यावरून असे स्पष्ट होत आहे की, विराटने सर्वाधिक धावा केल्या असल्या तरीही दोघांच्या ही आकडेवारीत जास्त फरक दिसून येत नाहीये. सरासरी आणि शतकांच्या बाबतीत विलियमसनने बाजी मारली आहे. त्याने या स्पर्धेत ३ शतके झळकावली आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यात या दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगू शकते.
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल (फिट असेल तर), ऋधिमान साहा (फिट असेल तर).
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी न्यूझीलंड संघ
केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टिरक्षक), विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या-
“रिषभ पंत भविष्यातील कर्णधार आहे, यात कोणतीही शंका नाही”, भारताच्या महान क्रिकेटपटूचे मोठे भाष्य