ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बिग बॅश लीग २०२१-२२ चे (Big Bash League 2021-22) सामने सुरू आहेत. अशात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू मॅथ्यू वेड (Matthew Wade) याने बिग बॅश लीग (बीबीएल) मधून अनिश्चित काळासाठी (Indefinite Break From BBL) ब्रेक घेण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला आहे. वैयक्तिक कारणास्तव आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्याने सांगितले आहे. तो या स्पर्धेत होबार्ट हरिकेन्स (Hobart Hurricanes) संघाचे नेतृत्त्व करत होता. आता या निर्णयानंतर तो शनिवारी (०८ जानेवारी) ब्रिस्बेन हिट संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात होबार्ट हरिकेन्स संघाचा भाग नसेल. त्याच्या अनुपस्थितीत पीटर हेंड्सकोंब संघाचे नेतृत्त्व करेल.
होबार्ट हरिकेन्स संघाचे प्रशिक्षक ऍडम ग्रिफिथ यांनी या गोष्टीची पुष्टी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मॅथ्यू वेड काही काळ बीबीएलपासून दूर असेल आणि सध्या हे स्पष्ट नाहीये की, तो केव्हा पुनरागमन करेल.
मॅथ्यू वेडच्या निर्यणामागील कारण सांगताना ऍडम ग्रिफिथ म्हणाले की, “वेड बरा आहे. तो सध्या काही गोष्टींचा सामना करतो आहे. मला अजूनही माहिती नाहीये की, तो कधी क्रिकेटमध्ये पुनमरागन करेल. परंतु आम्हाला अपेक्षा आहे की, तो लवकरच परत येईल. वेडच्या अनुपस्थितीत बेन मॅकडरमट होबार्ट हरिकेन्स संघाकडून यष्टीरक्षण करेल.”
मॅथ्यू वेडच्या बीबीएल कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत ९ सामने खेळताना १७७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून फक्त एकच अर्धशतक आले आहे, ज्यामध्ये त्याने ९३ धावांची दमदार खेळी केली होती. तसेच त्याने युएईमध्ये झालेल्या टी२० विश्वचषक २०२१ मध्ये शानदार खेळ दाखवला होता. यानंतर त्याच्याकडून बीबीएलमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. परंतु आता त्याने अर्ध्यातच संघाची साथ सोडली आहे.
त्याचा होबार्ट हरिकेन्स संघ सध्या ९ पैकी ४ सामने जिंकत आणि ५ सामने गमावत गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या त्यांच्या खात्यात १७ गुणांची नोंद आहे. मात्र आता स्वत कर्णधार मॅथ्यू वेडनेच संघाची साथ सोडल्याने होबार्ट हरिकेन्सचा संघ उर्वरित बीबीएल हंगामात कसे प्रदर्शन करतो हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रहाणे-पुजाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला भारतीय दिग्गज; म्हणाला…
स्टंपवर चेंडू आदळूनही स्टोक्स नॉटआऊट; सचिन म्हणतोय, ‘नवा नियम आला पाहिजे, गोलंदाजांशी प्रामाणिक…!’
विराटच्या फिटनेसविषयी मुख्य प्रशिक्षक द्रविड यांनी दिले अपडेट; म्हणाले…
हेही पाहा-