मागील एक वर्षात कोरोना वायरसमुळे क्रिकेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असले तरी मागील काही महिन्यांपासून हळूहळू बाबी पूर्वपदावर येत असून क्रिकेटला देखील सुरुवात झाली आहे. दुबईमध्ये झालेल्या आयपीएलनंतर ऑस्ट्रेलियामध्ये देखील क्रिकेटला सुरुवात झाली असून सध्या भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा व बिग बॅश लीग सुरू आहे. मात्र ऑस्ट्रेलिया मध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढला असून उपाययोजना म्हणून खेळाडूंसाठी काही कडक नियम बनवण्यात आलेले आहेत.यापैकीच एक नियम म्हणजे खेळाडूंना हेअर कटिंगसाठी कुठेही बाहेर जायची परवानगी नाही.
सिडनीत वाढलेल्या रुग्णांमुळे क्रिकेट बोर्डाने खेळाडूंसाठी नवीन नियमावली जाहीर केली. त्यानुसार बिग बॅश लीग मधील खेळाडूंना हेअर कटिंगसाठी बाहेर जाण्याची परवानगी नाही. ऑस्ट्रेलियातील स्थानिक वृत्तपत्राच्या बातमीनुसार क्रिकेट बोर्डाने खेळाडूंसाठी नियमांमध्ये कठोरता आणण्यास सुरुवात केली आहे. रिपोर्टनुसार 21 डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या प्रोटोकॉलमध्ये खेळाडूंना बाहेर जाण्याची परवानगी नाही.
दरम्यान हे लक्षात घेणे गरजेचे आहे की , डिसेंबर मधील सुरुवातीला जाहीर करण्यात आलेल्या प्रोटोकॉल नियमानुसार हेअर कटिंगसाठी बाहेर जाण्याची परवानगी होती. मात्र कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव व खेळाडूंची सुरक्षितता लक्षात घेता हा नियम आता रद्द करण्यात आलेला आहे.
महत्वाच्या बातम्या –
IND vs AUS: तिसरा कासोटी सामना सिडनीऐवजी होणार ‘या’ शहरात?
भारतातील ‘या’ आठ शहरात रंगणार टी२० विश्वचषकाचा थरार; बीसीसीआयने निवडली ठिकाणे
‘तेव्हा धोनी म्हणाला होता, सर आम्ही टी20 विश्वचषक जिंकूनच येऊ’