---Advertisement---

हरियाणा स्टीलर्सचा बंगालला घाव! कर्णधार विकास कंडोलाची धडाकेबाज कामगिरी

On: शुक्रवार, फेब्रुवारी 4, 2022 8:30 PM
bengal w
---Advertisement---

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात पहिल्या सामन्यात बंगाल वॉरियर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स हे संघ आमनेसामने आले. पहिल्या सहामधून बाहेर असलेल्या या दोन्ही संघांमध्ये चांगलीच लढत पाहायला मिळाली. मात्र, पूर्ण वेळेनंतर हरियाणा संघाने बंगालला १७ गुणांच्या मोठ्या फरकाने पराभुत केले.

सामन्याची सुरुवात अपेक्षेप्रमाणे रंगतदार झाली. दोन्ही संघांकडून खेळाडूंनी सातत्याने गुण घेणे सुरू ठेवले. त्यामुळे, कोणत्याही एका संघाला निर्णायक आघाडी मिळत नव्हती. मात्र, हरियाणा संघाचा कर्णधार विकास कंडोलाने सुपर रेड करत हरियाणा संघाला आघाडीवर नेले. बंगाल संघाने आपला पहिला ऑल आउट तब्बल १७ मिनिटे टाळला. अखेरीस हरियाणा संघाला बंगालला ऑल आऊट करण्यात यश आले. मध्यंतरापर्यंत हरियाणाकडे १९-१८ अशी नाममात्र आघाडी होती.

दुसऱ्या हाफमध्ये हरियाणा संघाने काहीसा आक्रमक खेळ दाखवला. पहिल्या दहा मिनिटात त्यांनी सहा गुणांची आघाडी मिळवली. विकास कंडोलाने सुपर रेड करत बंगालचे केवळ दोन गडी शिल्लक ठेवले. मात्र, बंगालचा कर्णधार मनिंदर यानेदेखील सुपर रेड करत संघाचा ऑल आउट टाळला. परंतु हरियाणा संघाने हार मानली नाही. अखेरच्या दीड मिनिटात बंगाल ऑल आउट झाल्याने हरियाणाला १३ गुणांची मोठी आघाडी मिळाली. पूर्ण वेळेनंतर हरियाणाने ४६-२९ असा दणदणीत विजय मिळवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---