भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी असणाऱ्या निवड समिती मधील एक जागा रिक्त आहे. या जागेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आता अर्ज मागवले आहेत. उत्तर विभागातील रिक्त असलेल्या जागेवर त्या सदस्यांची नियुक्ती केली जाईल. मात्र, या जागेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव असलेले खेळाडू अर्ज करण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.
🚨 NEWS 🚨
BCCI invites applications for one member of Men’s Selection Committee post.
Details 🔽https://t.co/jOU7ZIwdsl
— BCCI (@BCCI) June 22, 2023
या एकमेव जागेसाठी होणाऱ्या निवडीसाठी बीसीसीआयने काही नियम घालून दिले आहेत. या पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही कमीत कमी सात कसोटी सामने अथवा 30 प्रथमश्रेणी सामने किंवा 10 वनडे व 20 टी20 सामने खेळलेला असावा. तसेच त्या खेळाडूने पाच वर्षांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली असावी. तसेच तो बीसीसीआयच्या कोणत्याही पदावर सध्या असू नये. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 30 जून पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
स्टिंग ऑपरेशनमध्ये दोषी आढळल्यानंतर निवडसमिती अध्यक्ष चेतन शर्मा यांच्या जागी ही निवड करण्यात येणार आहे. मात्र, उत्तर विभागातून या जागेसाठी कोणताही मोठा खेळाडू अर्ज करण्याची शक्यता कमी आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या पदासाठी दिला जाणारा पगार.
निवड समिती अध्यक्षपदासाठी एक कोटी रुपये इतकी वार्षिक रक्कम दिली जाते. तर इतर सदस्यांना नव्वद लाख रुपये मिळतात. ही रक्कम त्यामानाने कमी असल्याने अनेक वरिष्ठ खेळाडू या पदासाठी अर्ज करत नाहीत. अखेरच्या वेळी के श्रीकांत हे अपार अनुभव असलेले दिग्गज खेळाडू निवड समिती अध्यक्ष होते. त्यांनी 2009 ते 2012 पर्यंत हा कार्यभार पाहिला होता.
सध्या या पदासाठी वीरेंद्र सेहवाग हा उमेदवार दिसून येत आहे. गौतम गंभीर, हरभजन सिंग व युवराज सिंग हे खेळाडू देखील उत्तर विभागाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, हे खेळाडू अलीकडेच निवृत्त झाल्याने ते पाच वर्षाच्या निकषात बसत नाहीत.
(BCCI Advertising For One Place Of Selection Committee Member From North Zone)
महत्वाच्या बातम्या-
सोलापूरविरूद्ध पुणेरी बाप्पाचे टार्गेट प्ले ऑफ्स! ‘या’ चौकडीकडून आहेत अपेक्षा
MPL: विजयी हॅट्रिकसह कोल्हापूर प्ले ऑफ्समध्ये! सीएसकेचे आव्हान संपुष्टात