यूएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा दुसऱ्या टप्प्यातील सामने पार पडत आहेत. ही स्पर्धा झाल्यानंतर यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. गेल्या २ वर्षांपासून जगभरात कोरोनाचे सावट असल्याने प्रेक्षकांना मैदानात येऊन सामना पाहण्यासाठी संधी मिळत नाहीये. परंतु बीसीसीआयच्या अथक प्रयत्नांमुळे आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षकांना मैदानात येऊन सामना पाहण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत देखील बीसीसीआयने प्रेक्षकांना मैदानात आण्ण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार १७ ऑक्टोबरपासून ते १४ नोव्हेंबर दरम्यान यूएई आणि ओमानमध्ये पार पडणार आहे. ही स्पर्धा भारतात पार पडणार होती. परंतु कोरोनाची भीती पाहता, बीसीसीआयने हे सामने यूएई आणि ओमानमध्ये आयोजित करण्याचे ठरवले आहे. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. आता अंतिम सामन्यात बीसीसीआय आणि अमिराती क्रिकेट बोर्ड २५ हजार प्रेक्षकांना मैदानात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु यासाठी त्यांना यूएईच्या अधिकाऱ्यांची भेट घ्यावी लागणार आहे.
या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडणार आहे. सध्या १० टक्के प्रेक्षकांना मैदानात येऊन सामना पाहण्याची अनुमती दिली गेली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, “बीसीसीआय आणि अमिराती क्रिकेट बोर्ड अंतिम सामन्यात मोठ्या संख्येने प्रेक्षकांना मैदानात बोलावण्याचा तयारीत आहे. जर सर्व गोष्टींचा विचार करून प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्यात आला, तर हे आणखी चांगले होईल. मात्र, परवानगीबाबत आता काही सांगता येणार नाही.” या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामने ओमानमध्ये देखील पार पडणार आहेत.
असे आहे संपूर्ण वेळापत्रक- (वेळ- स्थानिक प्रमाणवेळेनुसार)
पहिली फेरी-
१७ ऑक्टोबर – ओमान विरुद्ध पापुआ न्यू गिनी, मस्कत (दुपारी- २.०० वाजता)
१७ ऑक्टोबर – बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड, मस्कत (संध्या- ६.०० वाजता)
१८ ऑक्टोबर – आयर्लंड विरुद्ध नेदरलँड्स, अबुधाबी (दुपारी- २.०० वाजता)
१८ ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध नामिबिया, अबुधाबी (संध्या- ६.०० वाजता)
१९ ऑक्टोबर – स्कॉटलंड विरुद्ध पापुआ न्यू गिनी, मस्कत (दुपारी- २.०० वाजता)
१९ ऑक्टोबर – ओमान विरुद्ध बांगलादेश, मस्कत (संध्या- ६.०० वाजता)
२० ऑक्टोबर – नामिबिया विरुद्ध नेदरलँड, अबुधाबी (दुपारी- २.०० वाजता)
२० ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध आयर्लंड, अबुधाबी (संध्या- ६.०० वाजता)
२१ ऑक्टोबर – बांगलादेश विरुद्ध पापुआ न्यू गिनी, मस्कत (दुपारी- २.०० वाजता)
२१ ऑक्टोबर – ओमान विरुद्ध स्कॉटलंड, मस्कत (संध्या- ६.०० वाजता)
२२ ऑक्टोबर – नामिबिया विरुद्ध आयर्लंड, शारजाह (दुपारी- २.०० वाजता)
२२ ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध नेदरलँड, शारजाह (संध्या- ६.०० वाजता)
सुपर १२ फेरी
२३ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अबुधाबी (दुपारी- २.०० वाजता)
२३ ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज, दुबई (संध्या- ६.०० वाजता)
२४ ऑक्टोबर – अ गटातील अव्वल संघ विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, शारजाह (दुपारी- २.०० वाजता)
२४ ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
२५ ऑक्टोबर – अफगाणिस्तान विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, शारजाह (संध्या- ६.०० वाजता)
२६ ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज, दुबई (दुपारी- २.०० वाजता)
२६ ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, शारजाह (संध्या- ६.०० वाजता)
२७ ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, अबुधाबी (दुपारी- २.०० वाजता)
२७ ऑक्टोबर – ब गटातील अव्वल संघ विरुद्ध अ गटातील दुसरा संघ, अबू धाबी (संध्या- ६.०० वाजता)
२८ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, दुबई (दुपारी- २.०० वाजता)
२९ ऑक्टोबर – वेस्ट इंडीज विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, शारजाह (दुपारी- २.०० वाजता)
२९ ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई (संध्या- ६.०० वाजता)
३० ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, शारजाह (दुपारी- २.०० वाजता)
३० ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, दुबई (संध्या- ६.०० वाजता)
३१ ऑक्टोबर – अफगाणिस्तान विरुद्ध अ गटातील दुसरा संघ, अबुधाबी (दुपारी- २.०० वाजता)
३१ ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
१ नोव्हेंबर – इंग्लंड विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, शारजाह (संध्या- ६.०० वाजता)
२ नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, अबुधाबी (दुपारी- २.०० वाजता)
२ नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध अ गटातील दुसरा संघ, अबुधाबी (संध्या- ६.०० वाजता)
३ नोव्हेंबर: न्यूझीलंड विरुद्ध ब गटातील अव्वल संघ, दुबई (दुपारी- २.०० वाजता)
३ नोव्हेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, अबुधाबी (संध्या- ६.०० वाजता)
४ नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, दुबई (दुपारी- २.०० वाजता)
४ नोव्हेंबर – वेस्ट इंडिज विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, अबुधाबी (संध्या- ६.०० वाजता)
५ नोव्हेंबर: न्यूझीलंड विरुद्ध अ गटातील दुसरा संघ, शारजाह (दुपारी- २.०० वाजता)
५ नोव्हेंबर – भारत विरुद्ध ब गटातील अव्वल संघ, दुबई (संध्या- ६.०० वाजता)
६ नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज, अबुधाबी (दुपारी- २.०० वाजता)
६ नोव्हेंबर – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह (संध्या- ६.०० वाजता)
७ नोव्हेंबर: न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान, अबुधाबी ( दुपारी- २.०० वाजता)
७ नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध ब गटातील अव्वल संघ, शारजाह (संध्या- ६.०० वाजता)
८ नोव्हेंबर – भारत विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, दुबई (संध्या- ६.०० वाजता)
बाद फेरी-
१० नोव्हेंबर – उपांत्य सामना – १, अबुधाबी (संध्या- ६.०० वाजता)
११ नोव्हेंबर – उपांत्य सामना – २, दुबई (संध्या- ६.०० वाजता)
१४ नोव्हेंबर – अंतिम सामना, दुबई (संध्या- ६.०० वाजता)
महत्त्वाच्या बातम्या-
-‘या’ खेळाडूची लागली ‘लॉटरी’, टी-२० विश्वचषकात घेणार हार्दिक पंड्याची जागा?
-मुंबई इंडियन्सचे ग्रह फिरले, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या दारुण पराभवानंतर गुणतालिकेत ‘मोठा’ धक्का
-हॅट्रिक पूर्ण करताच हर्षल मैदानावर सुसाट धावत सुटला, आरसीबीचा ‘विजयी क्षण’ एकदा पाहाच