प्रथमच होत असलेल्या महिला आशिया चषक 2022 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बांगलादेशमधील सिल्हेट या ठिकाणी 1 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होईल. संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करेल. तर उपकर्णधारपदी स्मृती मंधाना हिची निवड केली गेली आहे. भारतीय संघ आशिया चषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध करेल.
🚨 NEWS 🚨: Team India (Senior Women) squad for ACC Women’s T20 Championship announced. #TeamIndia | #WomensAsiaCup | #AsiaCup2022
— BCCI Women (@BCCIWomen) September 21, 2022
सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. जेथे त्यांना 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-2 असा पराभव स्वीकारावा लागलेला. मात्र, संघाने वनडे मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. बुधवारी (21 सप्टेंबर) बीसीसीआयने एसीसी महिला टी20 चॅम्पियनशिपसाठी संघाची घोषणा केली. इंग्लंड दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या महाराष्ट्राच्या किरण नवगिरेलाही पुन्हा संधी देण्यात आली आहे. किरणने इंग्लंडविरुद्धच्या 2 टी20 सामन्यात 21 धावा केल्या होत्या. यष्टीरक्षक तानिया भाटिया व अष्टपैलू सिमरन बहादूर यांना राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. दोन आठवडे चालणाऱ्या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, यूएई, थायलंड व मलेशिया असे एकूण ७ संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाईल. अव्वल 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
या स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना खेळल्यानंतर, हरमनप्रीत कौरचा संघ 3 ऑक्टोबरला मलेशियाशी आणि 4 ऑक्टोबरला यूएईशी सामना करेल. यानंतर 7 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात महत्वपूर्ण सामना होणार आहे. अखेरच्या दोन सामन्यात भारतीय संघ 8 ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्ध आणि त्यानंतर 10 ऑक्टोबरला थायलंडविरुद्ध मैदानात उतरेल.
आशिया चषकासाठी भारतीय महिला संघ-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, स्नेह राणा, डी हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, गायकवाड, राधा यादव, किरण नवगिरे
राखीव खेळाडू- तानिया भाटिया व सिमरन दिलबहादूर
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एकेवेळी अतिशय मोठी शारिरीक समस्या असलेला गेल पुढे झाला ‘युनिवर्सल बॉस’
‘एवढ्या धावा केल्या, तरीही…’, कर्णधार रोहितने ‘यांच्या’ डोक्यावर फोडले पराभवाचे खापर
अस काय घडलं की भर मैदानात रोहितने पकडला कार्तिकचा गळा? पाहा व्हिडिओ