कोरोना या साथीच्या आजारामुळे जवळपास दीड वर्षापासून काहीसे थांबलेले भारतीय क्रिकेट आता पुन्हा सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देशांतर्गत क्रिकेटच्या आगामी २०२१-२०२२ हंगामाची अधिकृत घोषणा केली असून, मागील वर्षी भारतीय क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच रद्द केली गेलेली रणजी ट्रॉफी ही सर्वात जुनी स्पर्धादेखील खेळविण्यात येणार आहे. बीसीसीआयने ट्विट करून याबाबतची माहिती दिली.
मागील हंगाम झाला होता रद्द
भारतात २०२० सालाच्या मार्च महिन्यापासून कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे मागील वर्षीची आयपीएलदेखील भारताबाहेर खेळविण्यात आली. भारतातील सर्वात मोठी प्रथमश्रेणी स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीचा संपूर्ण हंगाम रद्द करण्यात आला होता. असे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच घडले होते. त्यानंतर, कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्यानंतर चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यात देशांतर्गत क्रिकेटमधील प्रमुख टी२० स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी व वनडे प्रकारातील विजय हजारे ट्रॉफी खेळवण्यात आली.
असा असेल नवा कार्यक्रम
बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून २०२१-२०२२ साठीच्या देशांतर्गत हंगामाची घोषणा केली. या हंगामाची सुरुवात २० ऑक्टोबर पासून होईल. २० ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या काळात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी पार पडेल. त्यानंतर, १६ नोव्हेंबर २०२१ ते १९ फेब्रुवारी २०२२ यादरम्यान रणजी ट्रॉफी खेळवली जाईल. हंगामाची अखेर विजय हजारे ट्रॉफीने २३ फेब्रुवारी ते २६ मार्च या काळात होईल.
🚨 NEWS 🚨: BCCI announces India’s domestic season for 2021-22
More Details 👇
— BCCI (@BCCI) July 3, 2021
महिला क्रिकेट हंगामाची देखील घोषणा
पुरुष क्रिकेटप्रमाणे महिला क्रिकेटच्या देशांतर्गत हंगामाची देखील घोषणा बीसीसीआयने केली. मागील वर्षी महिला क्रिकेटची कोणतीही स्पर्धा पार पडली नव्हती. वरिष्ठ महिला वनडे लीग २१ सप्टेंबरपासून होईल. महिलांची चॅलेंजर्स ट्रॉफी २७ ऑक्टोबरपासून खेळली जाईल. त्यानंतर वरिष्ठ महिला टी२० लीगने भारतीय देशांतर्गत क्रिकेट हंगामाची अखेर होईल. ही स्पर्धा १९ मार्चपासून खेळवण्यात येईल.
JUST IN: BCCI announces domestic schedule 2021-22
Senior Women's One Day League: Sep 21, 2021
Senior Women's One Day Challenger Trophy: Oct 27, 2021
Senior Women's T20 League: Mar 19, 2022#DomesticCricket #SeniorOneDay— Women’s CricZone (@WomensCricZone) July 3, 2021
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! इंग्लंडमधील क्रिकेट स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव, इथेच रंगणार आहे भारत-इंग्लंड कसोटी मालिका
सहकाऱ्याकडून कोहलीची स्तुती; म्हणे, ‘इतर खेळाडू १०० टक्के देतात, पण तो २०० टक्केच्या प्रयत्नात असतो’
विश्वविजेता भारतीय शिलेदार उतरणार ‘या’ परदेशी लीगच्या मैदानात, केलं रजिस्ट्रेशन