---Advertisement---

आनंदाची बातमी! बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटर्सच्या केली पगारात वाढ, रद्द सामन्यांचेही मिळणार ‘इतके’ मानधन

---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेऊन खेळाडू आणि त्यांच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. सोमवारी,२० सप्टेंबर रोजी, बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या पगारात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयने वरिष्ठ देशांतर्गत क्रिकेटपटूंचे वेतन, प्रति सामना ६०,००० रुपये केले आहे.

ज्या खेळाडूंनी ४० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत त्यांना प्रत्येक सामन्यासाठी ६० हजार रुपये मिळतील. त्याचबरोबर २३ वर्षाखालील आणि १९ वर्षाखालील खेळाडूंच्या वेतनातही वाढ करण्यात आली आहे. २३ वर्षांखालील खेळाडूंना प्रति सामना २५ हजार रुपये आणि १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंना प्रति सामना २० हजार रुपये दिले जातील.

सोमवारी बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून देशांतर्गत क्रिकेटपटूंना ही आनंदाची बातमी दिली. एवढेच नाही तर २०१९-२० देशांतर्गत हंगामात भाग घेतलेल्या खेळाडूंना ५० टक्के अतिरिक्त सामना शुल्क दिले जाईल. २०२०-२१ हंगाम रद्द झाल्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे २०२०-२१ मध्ये रणजी ट्रॉफीसह संपूर्ण देशांतर्गत हंगाम रद्द करण्यात आला होता.

सध्या, भारतीय देशांतर्गत खेळाडूंना सध्या एका रणजी ट्रॉफीच्या आणि विजय हजारे ट्रॉफीच्या एका सामन्यासाठी ३५ हजार रुपये मिळतात. दुसरीकडे, बीसीसीआय सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी प्रति सामना १७,५०० रुपये देते. पण आता बीसीसीआयने सामन्याची टक्केवारी वाढवून २५ हजार रुपये केली आहे. सौरव गांगुली यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये करार प्रणाली आणण्याविषयी बोलले होते.

भारतीय देशांतर्गत हंगाम २१ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या हंगामात वरिष्ठ महिला एकदिवसीय लीग आणि महिला एकदिवसीय चॅलेंजर ट्रॉफी देखील खेळल्या जातील. गेल्या वर्षी रद्द करण्यात आलेली रणजी करंडक स्पर्धा, यावर्षी १६ नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि १९ फेब्रुवारी २०२२ रोजी अंतिम सामना खेळला जाईल. विजय हजारे करंडक २३ फेब्रुवारी ते २६ मार्च दरम्यान खेळला जाईल. बीसीसीआयच्या या मोसमात एकूण २१२७ घरगुती सामने खेळले जातील.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘रनमशीन’ कोहलीसाठी आजचा दिवस असेल खास, ‘या’ दोन मोठ्या विक्रामांवर असेल नजर

‘छह छक्कों की कहानी, युवी की ज़ुबानी’, युवराजने मजेशीर व्हिडिओसह दिला १४ वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा

रायुडू-चहरच्या दुखापतींविषयी प्रशिक्षक फ्लेमिंग यांचा महत्त्वपूर्ण खुलासा, म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---