आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तानात खेळली जाईल. भारतीय संघ आपले सर्व सामने युएई मध्ये खेळणार आहे.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बऱ्याच काळानंतर टीम इंडियात परतला आहे. त्याची इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी निवड झाली आहे. आता तो एकदिवसीय सामन्यांमध्येही परतला आहे. शमीनं भारतासाठी शेवटचा सामना 2023 एकदिवसीय विश्वचषकात खेळला होता. नियमित कर्णधार रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करेल, तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. ऑस्ट्रेलियावरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झालेल्या जसप्रीत बुमराहची संघात निवड झाली आहे.
2025 चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा
भारत 20 फेब्रुवारीपासून बांगलादेशविरुद्ध स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. दुबईत 23 फेब्रुवारीला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उपांत्य फेरीचे सामने अनुक्रमे 4 आणि 5 मार्चला होतील तर अंतिम सामना 9 मार्चला खेळला जाईल. जर भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत प्रवेश केला, तर ते सामने दुबईमध्ये खेळले जातील. भारतीय संघ बाद फेरीत पोहोचू शकला नाही तर सामने पाकिस्तानच्या लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर होतील.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
अ गट – पाकिस्तान, बांग्लादेश, भारत आणि न्यूझीलंड
ब गट – अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारताचे सामने
20 फेब्रुवारी – विरुद्ध बांगलादेश – दुबई
23 फेब्रुवारी – विरुद्ध पाकिस्तान – दुबई
2 मार्च – विरुद्ध न्यूझीलंड – दुबई
हेही वाचा –
टीम इंडियात जागा मिळेना, या भारतीय क्रिकेटपटूनं सुरू केली स्वत:ची स्पोर्ट्स अकादमी
महिला टी20 वर्ल्डकपला आजपासून सुरुवात; जाणून घ्या कधी, कुठे पाहायचा थेट सामना
मनु भाकर-डी गुकेशसह इतर चौघांना खेलरत्न अवाॅर्ड, तर स्वप्नील कुसळेसह या 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान