बीसीसीआयनं टी20 इमर्जिंग आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बोर्डानं मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज तिलक वर्माला कर्णधारपद तर अभिषेक शर्माला उपकर्णधारपद दिलं. हे दोन्ही खेळाडू 18 ते 27 ऑक्टोबर दरम्यान ओमान येथे होणाऱ्या या स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करतील.
21 वर्षीय तिलक वर्माला भारतासाठी 4 एकदिवसीय आणि 16 टी20 सामन्यांचा अनुभव आहे. तर अभिषेक शर्मानं टीम इंडियासाठी 8 टी20 सामने खेळले आहेत. याशिवाय संघात 25 वर्षीय लेगस्पिनर राहुल चहरचाही समावेश आहे. भारत अ संघात पंजाब किंग्जचा प्रभसिमरन सिंग, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अनुज रावत, लखनऊ सुपर जायंट्सचा आयुष बदोनी आणि कोलकाता नाईट रायडर्सचा रमणदीप सिंग यांच्यासह अनेक आयपीएल स्टार आहेत. वैभव अरोरा (केकेआर), आर साई किशोर (गुजरात टायटन्स), हृतिक शौकिन (मुंबई इंडियन्स) आणि रसिक सलाम (दिल्ली कॅपिटल्स) गोलंदाजी करताना दिसतील.
स्पर्धेत भारत अ संघाला ब गटात स्थान देण्यात आलं असून टीम इंडियाला 19 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. अ गटात अफगाणिस्तान, बांगलादेश, हाँगकाँग आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. ही स्पर्धा प्रथमच टी20 फॉरमॅटमध्ये खेळली जात आहे. ती आतापर्यंत फक्त 50 षटकांचीच खेळली जात होती.
टी20 इमर्जिंग कप स्पर्धेसाठी भारत ‘अ’ संघ –
तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा (उपकर्णधार), प्रभसिमरन सिंग, निशांत सिंधू, रमणदीप सिंग, नेहाल वढेरा, आयुष बदोनी, अनुज रावत, साई किशोर, हृतिक शोकिन, राहुल चहर, वैभव अरोरा, अंशुल कंबोज, आकिब खान, रसिक सलाम
हेही वाचा –
भारत, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू बाबर आझमच्या समर्थनार्थ, जाणून घ्या कोण काय म्हणालं?
फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सलग चौथं शतक ठोकलं, मात्र अद्यापही भारतीय संघात जागा मिळाली नाही!
गौतम गंभीरचं वादाशी जुनं नातं, समाजसेवेतही दिलंय योगदान; जाणून घ्या भारताच्या हेड कोचचे माहित नसलेले किस्से