दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य संघ विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला जात असताना, शिखर धवनच्या नेतृत्वात अनेक युवा खेळाडूंना या मालिकेत संधी दिली गेलीये. उभय संघांमध्ये तीन सामन्यांची मालिका खेळली जाईल.
🚨 NEWS 🚨: India’s squad for ODI series against South Africa announced. #TeamIndia | #INDvSA | @mastercardindia
— BCCI (@BCCI) October 2, 2022
रोहित शर्माचे नेतृत्वातील प्रमुख भारतीय संघ टी20 मालिकेनंतर विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. त्यामुळे या मालिकेत प्रामुख्याने इतर खेळाडूंना संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्याचप्रमाणे मागील काही काळापासून भारताचा पार्टटाइम कर्णधार बनलेल्या शिखर धवनकडे संघाचे नेतृत्व दिले गेलेय. तर श्रेयस अय्यर संघाचा उपकर्णधार असेल.
या संघात देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देखील संधी दिली गेली आहे. आयपीएलपासून जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला मध्य प्रदेशचा अनुभवी फलंदाज रजत पाटीदार प्रथमच भारतीय संघाच्या जर्सीमध्ये दिसेल. इराणी ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करणारा पश्चिम बंगालचा गोलंदाज मुकेश कुमार हा देखील प्रथमच संघाचा भाग बनला आहे. अष्टपैलू शाहबाझ नदीम याला देखील यावेळी पदार्पणाची संधी मिळू शकते. टी20 विश्वचषकासाठी राखीव खेळाडू असलेल्या श्रेयस अय्यर व दीपक चहर यांना यावेळी आपला फॉर्म सिद्ध करण्याची संधी असेल. हे सामने अनुक्रमे 6, 9 व 11 ऑक्टोबर रोजी खेळले जातील.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार , आवेश खान , मोहम्मद सिराज, दीपक चहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सरफराज खानची ‘फर्स्ट क्लास’ इनिंग, ब्रॅडमन यांना टाकले मागे!
पाकिस्तानच्या सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूची आईदेखील उतरली क्रिकेटच्या मैदानात; मुलीने पोस्ट करत लिहिले…