इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाला काही महिन्यात सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे या हंगामासाठी खेळाडूंचा मेगा लिलाव पार पडणार आहे. या लिलावाला आता केवळ एक दिवस बाकी असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने या लिलावापूर्वी १३ खेळाडूंची यादी जाहीर केली, ज्यांची गोलंदाजी शैली अवैध (illegal bowling action) किंवा संशयित असल्याचे आढळले आहे. यातील ३ खेळाडूंवर गोलंदाजीसाठी बंदीही घालण्यात आली आहे.
बीसीसीआयने (BCCI) दिलेल्या माहितीनुसार १३ असे खेळाडू आहेत, ज्यांची गोलंदाजी शैलीची तपासणीच्या अंतर्गत येते किंवा ज्यांच्यावर आयपीएल २०२२ हंगामासाठी गोलंदाजी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या अशा १३ खेळाडूंच्या यादीत मनीष पांडे, केएल श्रीजीत आणि इशांक जग्गी यांच्या गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली आहे (banned from bowling).
तसेच विदर्भाचे दर्शन नळकांडे, अपूर्व वानखडे; महाराष्ट्राचे विकी ओत्सवाल, अजीम काजी; तसेच धर्मेंद्र सिंग जडेजा (सौराष्ट्र), सुदीप चॅटर्जी (बंगाल), रविकुमार समर्थ (कर्नाटक), अर्पित गुलेरिया (हिमाचल प्रदेश) आणि जय बिस्ता (उत्तराखंड) या १० खेळाडूंची गोलंदाजी शैली संशयित असल्याचे आढळले आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या गोलंदाजीवर लक्ष ठेवले जाईल आणि त्यांना संशयित गोलंदाजीसाठी पुन्हा बोलवण्यात आले, तर त्यांना संभावित बंदीला सामोरे जावे लागू शकते.
दरम्यान, बंदी घालण्यात आलेल्या तिन्ही खेळाडूंच्या आयपीएल लिलिवातील भविष्यावर फारसा परिणाम होणार नाही. कारण, मनीष आणि इशांक या दोघांनीही त्यांना लिलावासाठी फलंदाजांच्या गटात ठेवले आहे. तसेच कर्नाटकचा केएल श्रीजीथ हा यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीवर बंदी आली, तरी त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही.
आयपीएल लिलाव यंदा २ दिवस चालणार असून एकूण ५९० खेळाडूंचा लिलावास समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हिटमॅनला पराक्रमाची संधी! अवघ्या १४ धावा करताच रोहित तोडणार गांगुली-तेंडुलकरचा मोठा विक्रम
‘माझं क्रेडिट दुसऱ्यांनीच घेतलं,’ असं म्हणणाऱ्या रहाणेने पाहा नक्की कुणावर साधलाय निशाणा