Manish Pandey Bans Form Bowling: भारतीय क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचे अनेक खेळाडू आयपीएल 2024 लिलावात आपल्यावर लावल्या जाणाऱ्या बोलीची प्रतीक्षा करत आहेत. याच खेळाडूंमधील एका मोठ्या खेळाडूला दिल्ली कॅपिटल्स संघाने रिलीज केले होते. आता त्याच्यावर बीसीसीआयने गोलंदाजी करण्यास बंदी घातली आहे. खरं तर, बोर्डाच्या हवाल्याने क्रिकबझच्या रिपोर्टमध्ये शनिवारी (दि. 16 डिसेंबर) 7 गोलंदाजांची ऍक्शन संशयास्पद आढळल्याची माहिती समोर आली होती. त्या यादीतील दोन खेळाडू असेही होते, ज्यांच्यावर गोलंदाजी करण्यास बंदी घातली होती.
ते खेळाडू नेमके कोण?
बीसीसीआयने ज्या खेळाडूंवर गोलंदाजी करण्यास बंदी घातली आहे, त्यात मनीष पांडे (Manish Pandey) याच्या नावाचाही समावेश आहे. त्याने भारताकडून 29 वनडे सामने आणि 39 टी20 सामने खेळले आहेत. तसेच, तो आयपीएलमधील जुना खेळाडू आहे. त्याने 2008 पासून आतापर्यंत 170 सामने खेळले आहेत. तो पहिल्या हंगामापासून या आयपीएल (IPL) स्पर्धेचा भाग आहे. आता त्याची गोलंदाजी ऍक्शन संशयास्पद आढळली आहे.
खरं तर, मनीष नेहमी गोलंदाजी करत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याने गोलंदाजी केली नाही. आयपीएळमध्ये तो पार्ट टाईम ही भूमिका बजावतो. मात्र, आयपीएल 2024 (IPL 2024) हंगामापूर्वी बीसीसीआयकडून जी यादी समोर आली, त्यात त्याचे आणि कर्नाटकच्या केएल श्रीजीतच्या नावाचा समावेश होता, ज्यांच्यावर गोलंदाजी करण्यास बंदी घातली आहे.
https://twitter.com/Jay_Cricket18/status/1736006138972471703
तसं पाहिलं, तर मनीषने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 5, अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 8 आणि टी20 क्रिकेटमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मनीष पांडेला गोलंदाजी करताना पाहिले गेले नाहीये. तो आयपीएलमध्येही 170 सामने खेळताना कधीच गोलंदाजी करताना दिसला नाही. मात्र, आता कदाचित तो कधीच गोलंदाजी करताना दिसणार नाही. कदाचित अलीकडच्या अ दर्जाच्या आणि प्रथम श्रेणी क्रिकेटदरम्यान त्याची गोलंदाजी ऍक्शन संशयास्पद आढळली असावी, ज्यामुळे बीसीसीआयने ही कारवाई केली. मात्र, ही माहिती अधिकृतरीत्या समोर येणे अध्याप बाकी आहे. त्याचे नाव त्या यादीत आले आहे, जी लीक झाली आहे. क्रिकबझने सांगितले आहे की, ही यादी आधी शेअर केली गेली होती, ज्यानंतर डिलीट करण्यात आली.
Breaking News:
Big blow to @ChennaiIPL Auction strategy as Manish Pandey is banned from bowling.
They won't bid for him now ????????#iplauction2024 pic.twitter.com/l6vT1A1Y9e— Ashish Gupta (@aapka_aasheesh) December 16, 2023
कोणत्या 7 गोलंदाजांची ऍक्शन संशयास्पद?
मनीष आणि श्रीजीत यांच्याव्यतिरिक्त 7 असे खेळाडू आहेत, ज्यांची गोलंदाजी ऍक्शन संशयास्पद असल्याचे सांगितले गेले. या यादीतील सर्वात मोठे नाव चेतन सकारिया आहे, ज्याने भारताकडून पदार्पणही केले आहे. त्याच्याव्यतिरिक्त रोहन कुन्नूमल, सलमान निजार, चिराग गांधी, तनुश कोटियन, अर्पित आणि सौरभ दुबे यांच्याही नावाचा समावेश आहे. या सर्वांनी त्यांची नावे आयपीएल फ्रँचायझींकडे सोपवली आहेत. मात्र, आता कदाचित फ्रँचायझींना त्यांच्यात रस नसेल. मात्र, या गोलंदाजांवर बंदी घातली गेली नाहीये. त्यांना त्यांच्या गोलंदाजी ऍक्शनमध्ये सुधारणा करावी लागेल आणि बोर्डापुढे टेस्ट द्यावी लागेल. (bcci bans cricketer manish pandey from bowling before ipl 2024 more 6 others action illegal)
हेही वाचा-
हैदराबादने ज्या पठ्ठ्याला केले रिलीज, त्यानेच केली 442च्या स्ट्राईक रेटने वादळी फलंदाजी; फक्त 7 चेंडूत…
रोहित मुंबई इंडियन्सची साथ सोडून आयपीएल 2024च्या लिलावात सामील होणार? वाचा सविस्तर






