---Advertisement---

आता ५ कोटींचे मिळणार फक्त ३ कोटी; बीसीसीआयने दिला पुजारा अन् रहाणेसह ‘या’ दोन खेळाडूंना धक्का

Ajinkya-Rahane-And-Cheteshwar-Pujra
---Advertisement---

क्रिकेट विश्वातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) २०२१-२२ या वर्षासाठी केंद्रीय करार मिळवणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यासह (Hardik Pandya) इतर ४ खेळाडूंना चांगलाच फटका बसला आहे. या सर्व खेळाडूंची एक श्रेणी कमी करण्यात आली आहे. मागील काळातील खराब प्रदर्शनामुळे अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नव्हते. याव्यतिरिक्त यष्टीरक्षक वृद्धिमान साहादेखील (Wriddhiman Saha) संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. या चारही खेळाडूंची एक श्रेणी कमी करण्यात आली आहे. पंड्या तर टी२० विश्वचषकापासूनच संघातून बाहेर आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, पुजारा आणि रहाणे यांना खराब फॉर्ममुळे ब श्रेणीमध्ये हलवण्यात आले आहे, जे आधी अ श्रेणीमध्ये होते. दुसरीकडे, अष्टपैलू पंड्याच्या श्रेणीमध्येही मोठी घसरण झाली आहे. त्याला अ श्रेणीतून थेट क श्रेणीत हलवण्यात आले आहे. यष्टीरक्षक फलंदाज साहाला ब श्रेणीतून क श्रेणीत हलवण्यात आले आहे.

https://twitter.com/ANI/status/1499049200365244416?t=QK2EX2TnKMavWDTIqedZfg&s=19

बोर्डाने बनवल्या आहेत ४ श्रेणी
बीसीसीआयने केंद्रीय करार ४ श्रेणींमध्ये विभागला आहे. अ+ श्रेणीमध्ये सामील खेळाडूंना ७ कोटी रुपये दिले जातात. तसेच अ, ब आणि क श्रेणीतील खेळाडूंना अनुक्रमे ५ कोटी, ३ कोटी आणि १ कोटी रुपये दिले जातात. मात्र, आतापर्यंत बोर्डाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आली नाहीये. मागील वर्षी अ+ गटात फक्त ३ खेळाडू सामील होते. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, या तिघांनाही पुन्हा एकदा अ+ श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे.

मागील हंगामात एकूण २८ खेळाडूंना करार मिळाला होता. मात्र, यावेळच्या हंगामात ही संख्या वाढण्याची अपेक्षा कमी आहे. फिरकीपटू कुलदीप यादव मागील हंगामात क श्रेणीत होता. माध्यमांतील वृत्तानुसार, त्याला बाहेर करण्यात आले आहे. अ श्रेणीत आर अश्विन, रवींद्र जडेजा, केएल राहुल, मोहम्मद शमी, रिषभ पंत, तर ब गटात चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज आणि ईशांत शर्माला सामील करण्यात आले आहे. त्यानंतर क श्रेणीत शिखर धवन, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर, शुबमन गिल, हनुमा विहारी, युझवेंद्र चहल, वृद्धिमान साहा, सूर्यकुमार यादव आणि मयंक अगरवाल यांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---