भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात २४ फेब्रुवारीपासून टी२० आणि कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाची घोषणा केली आहे. मात्र, भारतीय संघात अष्टपैलू हार्दिक पंड्या याला (Hardik Pandya) संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्याच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आता याबद्दल भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Cheten Sharma) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हार्दिक २०२१ टी२० विश्वचषकापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. तसेत त्याने १७ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धतही न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल बोलताना चेतन शर्मा यांनी सांगितले आहे की, त्याची भारतीय संघात निवड तेव्हाच होईल, जेव्हा तो गोलंदाजी करण्यासाठी पूर्ण तंदुरुस्त असेल.
चेतन शर्मा यांना प्रश्न विचारण्यात की, हार्दिक रणडी ट्रॉफीमध्ये का खेळत नाही, यावर त्यांनी उत्तर दिले की, ‘जर कोणाला खेळायची इच्छा नसेल, तर निवड समिती राज्य क्रिकेटच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करत नाही. तुम्ही हार्दिकला विचारू शकतो की तो रणजी ट्रॉपी का खेळत नाही. आमची त्या खेळाडूंवर नजर आहे, जे रणजीमध्ये खेळत आहेत आणि चांगले प्रदर्शन करत आहेत.’
त्याचबरोबर हार्दिकच्या उपलब्दतेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, हार्दिक नक्कीच भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग होता. पण, जखमी झाल्यानंतर आता हेच म्हणावे लागेल की, जर तो पूर्ण तंदुरुस्त झाला आणि खेळण्यासाठी तयार असेल, तसेच तो गोलंदाजी करणार असेल आणि मॅच फिटनेस मिळवू शकत असेल, तर त्याच्या नावाचा विचार नक्की केला जाईल.
आयपीएल २०२२ मध्ये दिसू शकतो हार्दिक पंड्या
हार्दिक जरी सध्या क्रिकेटपासून दूर असला तरी आगामी आयपीएल २०२२ हंगामात तो खेळताना दिसून येऊ शकतो. त्याला या हंगामासाठी गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार करण्यात आले आहे. गुजरात संघाने त्याला १५ कोटींची किंमत मोजत संघात स्थान दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
युएईत सुरू होणार नवी टी२० लीग! शाहरुखसह अदानी-अंबानी असणार संघमालक
रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राची दणदणीत विजयाने सुरुवात! सत्यजित बच्छावची भेदक गोलंदाजी
युझीच्या बॉलिंगवर बिश्नोईने सोडले कॅच; आता चहलच म्हणतोय, ‘मी त्याला खोपच्यात घेऊन…’






