---Advertisement---

बीसीसीआयनं बदलले क्रिकेटचे नियम, या स्पर्धेपासून होणार लागू

On: शुक्रवार, ऑक्टोबर 11, 2024 5:09 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआयनं नुकतेच देशांतर्गत क्रिकेटचे नियम बदलले आहेत. नव्या नियमानुसार, कोणत्याही खेळाडूनं चेंडूला थूक लावल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. याशिवाय, रिटायर्ड हर्ट झालेल्या खेळाडूला पुन्हा खेळण्याची संधी मिळणार नाही. त्याला बाद मानलं जाईल. बीसीसीआयनं रणजी ट्रॉफी 2024 च्या नवीन हंगामापूर्वी हे बदल केले आहेत. मात्र या नियमांत काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत.

‘क्रिकबझ’च्या एका बातमीनुसार, बीसीसीआयनं खेळाडू रिटायर्ड हर्ट होण्याच्या नियमांत बदल केला आहे. आता कोणताही खेळाडू दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला, तर त्याला त्वरित बाद मानलं जाईल. यानंतर तो पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात येऊ शकणार नाही. याचा विरोधी संघाच्या संमतीशी काहीही संबंध असणार नाही. बीसीसीआयनं राज्याच्या संघांना एक प्रसिद्धीपत्रक पाठवलं आहे. यामध्ये सर्व बदललेले नियम सविस्तरपणे सांगण्यात आले आहेत.

कोविड 19 महामारीनंतर क्रिकेटमध्ये अनेक बदल दिसून आले. यानंतर संघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडूवर लावण्यात येणाऱ्या थुंकीबाबत खबरदारी घेण्यास सुरुवात केली. आता बीसीसीआयनं देशांतर्गत क्रिकेटमध्येही कठोर नियम आणले आहेत. नव्या नियमानुसार, कोणत्याही खेळाडूनं चेंडूला थुक लावली, तर त्याला दंड आकारला जाईल. यासह तो चेंडू त्वरित बदलला जाईल.

यासह धाव थांबवण्याचे नियमही बदलण्यात आले आहेत. बदललेल्या नवीन नियमानुसार, जेव्हा फलंदाज क्रॉस केल्यानंतर धाव थांबवण्याचा निर्णय घेतो, तेव्हा ओव्हरथ्रो द्वारे बाऊंड्री मिळते. अशा परिस्थितीत, पुन्हा क्रॉस करण्यापूर्वी केवळ बाऊंड्री मानली जाईल. त्यामुळे फक्त चार धावा मिळतील.

हेही वाचा – 

बाबर आझमनं कसोटीमध्ये शेवटचं अर्धशतक कधी ठोकलं होतं? अशा प्रकारे बनला हिरोचा झिरो!
पाकिस्तानच्या कर्णधाराची हकालपट्टी? लाजिरवाण्या पराभवानंतर पीसीबी घेणार मोठा निर्णय
इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या नावे हे 5 लाजिरवाणे रेकॉर्ड, एकदा वाचाच!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---