भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ टी२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. इंग्लंडविरुद्धचा साउथम्पटन येथे झालेला पहिला टी२० सामना भारताने ५० धावांनी जिंकला. यामुळे भारतीय संघाने ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने हा सामना जिंकला आहे. या सामना विजयानंतर कर्णधार रोहितच्या नावावर सलग १३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकण्याच्या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे.
या सामन्याआधी बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघ घोषित केला आहे. मात्र, या संघाचे नेतृत्व भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याच्याकडे दिले गेले आहे. अशाप्रकारे रोहित भारतीय क्रिकेट संघाच्या तिन्ही स्वरुपात कर्णधार झाल्यापासून बीसीसीआयने आता पाचवा कर्णधार बदलला आहे.
भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचे नेतृत्व केले होते. राहुल आणि रोहितच्या अनुपस्थितीत बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी रिषभ पंत (Rishabh Pant) याला, तर आयर्लंड विरुद्धच्या २ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला कर्णधार म्हणून आजमवून पाहिले आहे. तर दुसरीकडे नुकत्याच भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या पुनर्नियाजीत कसोटी सामन्यापुर्वी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा कोविड पॉजिटीव्ह सापडला होता. ज्यामुळे त्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा भारताचे नेतृत्व करताना दिसला.
रोहितच्या अनुपस्थित भारताने क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपाच्या कर्णधारांमध्ये अनेक बदल केले आहेत. रोहित राष्ट्रीय संघाचा कर्णधार झाल्यापासून गेल्या ६-७ महिन्यात क्रिकेटच्या सर्व स्वरुपात मिळून भारताचे तब्बल पाच कर्णधार बदलले आहेत. रोहितने ८ डिसेंबर २०२१ मध्ये टी२० आणि वनडे संघाचे, तर १९ फेब्रुवारी २०२२ मध्ये कसोटी संघाचे नेतृत्व सांभाळले. तेव्हापासून त्याने भारताचा कर्णधार म्हणुन एक ही सामना गमावला नाहीये. त्याच्या अनुपस्थितीत भारताने अनेक कर्णधार बदलुन पाहिले मात्र भारताला त्यातील जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त सामने गमवावे लागले आहेत. भारताने कर्णधार रोहितच्या अनुपस्थितीत आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये भारताला ६ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर केवळ ४ सामन्यांत विजय मिळाला आहे. तर १ सामना अनिर्णीत राहिला आहे.
दरम्यान भारताला आता धवनच्या रुपाने पुन्हा एक नवीन कर्णधार मिळणार आहे हे मात्र नक्की. वेस्टइंडीज विरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांना पुन्हा एकदा विश्रांती देण्यात आली आहे. यामुळे या मालिकेतही काही युवा खेळाडूंना आपले कौशल्या दाखवण्याची संधी राहणार आहे. याच संघाचे नेतृत्त्व शिखर धवनकेडे देण्यात आले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सर, मी जास्त डोकं लावत नाही’, पत्रकाराने विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर हार्दिक पंड्याचं भारी उत्तर
भुवीच्या इनस्विंग चेंडूवर बाद होऊनही त्याचच गुणगान गातोय बटलर, वाचा काय म्हणालाय
आख्ख्या वनडे कारकीर्दीत एकही षटकार मारू न शकलेले ‘हे’ आहेत कमनशिबी क्रिकेटर