---Advertisement---

विराटच्या कसोटी कर्णधारपद सोडण्यावर बीसीसीआयची आली पहिली प्रतिक्रिया; पाहा काय म्हटलंय

Virat-Kohli
---Advertisement---

शनिवारी (१५ जानेवारी) विराट कोहली याने सर्वांनाच धक्का देत भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत कसोटी कर्णधारपद सोडत असल्याचे घोषणा केली. त्यानंतर अनेकांनी त्याच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देखील प्रतिक्रिया दिली आहे.

विराटने सोशल मीडियावर मोठी पोस्ट केली आहे. यात त्याने म्हटले आहे की, ‘भारताचा कसोटी कर्णधार म्हणून थांबण्याची माझी वेळ आली आहे.’ विराटची ही पोस्ट रिट्वीट करताना बीसीसीआयने प्रतिक्रिया दिली आहे.

बीसीसीआयने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘कसोटी संघाला एका अभूतपूर्व उंचीवर पोहचवल्याबद्दल आणि प्रशंसनीय नेतृत्त्व गुणांसाठी बीसीसीआय विराट कोहलीचे अभिनंदन करत आहे. त्याने भारताचे ६८ कसोटी सामन्यात नेतृत्त्व करताना ४० सामन्यांत विजय मिळवला, यासह तो भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला.’

विराट गेले ७ वर्षे भारतीय कसोटी संघाचे नियमितपणे नेतृत्त्व करत होता. त्याने जानेवारी २०१५ मध्ये एमएस धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय कसोटी संघाने नियमित कर्णधारपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. तेव्हापासून त्याने आपल्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले.

विराटची कसोटी कर्णधार म्हणून कामगिरी
विराटने आत्तापर्यंत ६८ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्त्व केले होते. त्याने यातील ४० सामन्यात विजय मिळवला असून १७ सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच ११ सामने त्याच्या नेतृत्त्वाखाली अनिर्णित राहिले.

विराटने या ६८ सामन्यांपैकी परदेशात ३६ सामन्यात नेतृत्त्व केले. त्याने यातील १६ सामन्यांत विजय मिळवले असून १४ सामन्यात पराभव स्विकारले आहेत. तसेच ६ सामने अनिर्णित राहिले आहेत. तो परदेशातही सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा भारतीय कर्णधार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणाराही पहिला भारतीय कर्णधार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराटने राजीनामा पोस्टमध्ये उल्लेख केलेल्या त्या दोन व्यक्ती कोण? का घेतली त्यांची नावे? वाचा सविस्तर

विराटने कसोटी कर्णधारपद सोडताना का घेतले धोनीचे नाव? नक्की काय ठरलं याला कारण?

विराटचा कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा! पद सोडताना लिहिली भली मोठी पोस्ट, वाचा काय म्हटलंय…

व्हिडिओ पाहा – रोहित शर्माला टीम इंडियाचा वनडे कर्णधार करण्याचा निर्णय ‘या’ ४ कारणांमुळे चुकीचा

रोहित शर्माला टीम इंडियाचा वनडे कर्णधार करण्याचा निर्णय 'या' ४ कारणांमुळे चुकीचा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---