आज बीसीसीआयने खेळाडूंना एका वर्षासाठी मिळणाऱ्या कराराच्या रकमेची घोषणा केली आहे. या करारात काही बदल देखील करण्यात आलेले आहेत. तसेच या कराराच्या यादीतून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे नाव बीसीसीआयने वगळले आहे. त्यामुळे त्याला आजच्या दिवसात दुसरा मोठा धक्का बसला आहे.
तसेच बीसीसीआयने हा करार जाहीर करताना पुरूष खेळाडूंच्या प्रकारात नविन श्रेणीचा समावेश करण्यात आला असुन त्याला A+ असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता पुरूष खेळाडूंच्या प्रकारात A+ ,A ,B ,C अशा ४ श्रेणी झाल्या आहेत. हा करार आॅक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीसाठी असून सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीने याची घोषणा केली आहे.
विशेष म्हणजे यातील श्रेणीमध्ये शमीचा समावेश करण्यात आलेला नाही. शमी सध्या इंडीया ‘अ’ कडून खेळत असुन देवधर ट्राॅफीचे हे सामने धरमशाला येथे सुरू आहेत. त्याने भारताकडून ३० कसोटी, ५० वनडे आणि ७ टी२० सामने खेळले आहेत.
या यादीत अगदी भारताकडून ४ कसोटी आणि १ वनडे खेळलेल्या जयंत यादवचाही C श्रेणीत समावेश करण्यात आलेला आहे. मात्र शमी ५ वर्षे भारताकडून खेळत आहे तरीही त्याचा बीसीसीआयच्या एका वर्षासाठी मिळणाऱ्या कराराच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही.
शमीसाठी आजचा हा दुसरा मोठा धक्का आहे. आज सकाळीच त्याच्यावर त्याची पत्नी हसीन जहांने त्याचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचे आरोप केले आहेत.
Not condoning anything, but can the @bcci deny/withhold a contract to Mohammad Shami while employing Gyanendra Pandey as junior selector? Pandey was arrested on the charge of assaulting his wife in 2000. This is in the public domain. Shami is unproven allegations so far.
— Anand Vasu (@anandvasu) March 7, 2018
The first fallout for Mohammad Shami after his wife's allegations: BCCI hasn't given him the players contract. #BreakingNews @IndiaToday @aajtak
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) March 7, 2018
How is it BCCI’s business what happens in players’ personal/family lives as long as players are performing on the field. As Shami surely did in SA https://t.co/4SgW6nwJ3t
— Shekhar Gupta (@ShekharGupta) March 7, 2018
Guys. Don't outrage so fast. BCCI hasn't dropped the contract for Shami, could be just withheld due to issue happening in the last 24 hours and they may well issue him one, once this issue is settled. Let's wait to hear from them than giving so much importance now.
— Prabhu (@Cricprabhu) March 7, 2018





