पॅरिस ऑलिम्पिकला 24 जुलैपासून सुरुवात होत आहे. त्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला. ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंना मदत करण्यासाठी बीसीसीआय 8.5 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा सचिव जय शाह यांनी केली आहे. बोर्ड ही रक्कम भारतीय ऑलिम्पिक संघटनेला देणार आहे. जय शाह यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे 117 खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये 70 पुरुष आणि 47 महिला खेळाडू आहेत. जय शहा यांनी X वर एक पोस्ट शेअर करून लिहिलं की, “पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या खेळाडूंना बीसीसीआय पाठिंबा देईल हे जाहीर करताना मला अभिमान वाटत आहे. या मोहिमेसाठी आम्ही भारतीय ऑलिम्पिक संघटनेला 8.5 कोटी रुपये देत आहोत.”
पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलैला सुरू होऊन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारत आतापर्यंतचा आपला सर्वात मोठा संघ पाठवणार आहे. भारतानं ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत एकूण 35 पदके जिंकली आहेत. यामध्ये 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 16 कांस्य पदकांचा समावेश आहे. 2020 टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी सर्वात यशस्वी राहिलं होतं, ज्यामध्ये देशानं 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह एकूण 7 पदकं जिंकली होती. यावेळी भारतीय संघाकडून यापेक्षा जास्त पदकांची अपेक्षा असेल.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे 5 खेळाडू सहभागी होत आहेत. प्रवीण जाधव (तिरंदाजी), अविनाश साबळे (ॲथलेटिक्स), सर्वेश कुशारे (ॲथलेटिक्स), चिराग शेट्टी (बॅडमिंटन) आणि स्वप्निल कुसळे (रायफल शूटिंग) हे ते 5 खेळाडू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे किती खेळाडू भाग घेत आहेत? कोणत्या राज्यातील खेळाडूंची संख्या सर्वाधिक?
कोण आहे साईराज बहुतुले? श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून झाली निवड
‘या’ 5 दिग्गज खेळाडूंनी आपल्या देशासाठी कधीच नाही खेळला विश्वचषक…!