श्रीलंकेचा भारत दौरा 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. मात्र, ही काही सामान्य घोषणा नाहीये, यात भारतीय संघाच्या भविष्याचे संकेत लपले आहेत. भारताच्या टी20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या याच्याकडे सोपवण्यात आले असून एकदिवसीय मालिकेत तो उपकर्णधार असणार आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या टी20 मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची चांगली संधी आहे.
श्रीलंकेविरुद्ध टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली, त्यात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याचा अर्थ असा आहे की बीसीसीय आता नव्या खेळाडूंना नेतृत्वाची संधी देण्यावर भर देत आहे. कर्णधारपदाचा दावेदार मानला जाणारा केएल राहुल (KL Rahul) या शर्यतीत खूप मागे पडला आहे. बीसीसीयने यातून छूपा संदेश दिलाय की आता नेतृत्वाची जबाबदारी पुढच्या पिढीची आहे. जुन्या इंजिनने गाडी पुढे जाऊ शकणार नाही. म्हणजेच रोहित, विराट, भुवनेश्वर यांसारखे दिग्गज खेळाडू भविष्यातील टी20च्या योजनेत नाहीत.
युवा खेळाडूंवर विश्वास
बांगलादेश संघाविरुद्ध झळकावलेल्या झंझावती द्विशतकामुळे त्याच्याकडे डावखुऱ्या सलामीवारीच्या रुपात पाहिले जात आहे. त्याचबरोबर शुबमन गिल (Shubman Gill) याने देखील चांगले प्रदर्शन केले आहे. मात्र,त्याला पदार्पणानंतर फक्त तीन एकदिवसीय सामन्यात संधी मिळाली. वेगवान गोलंदाज शिवम मावी (Shivam Mavi) याला देखील टी20 संघात संधी मिळाली आहे. तो पहिल्यांदा 2018च्या अंडर-19 विश्वचषकात झळकला होता. त्यात त्याने 18.88च्या सरासरीने 9 विकेट घेतल्या होत्या. तसेच संघात मुकेश कुमार (Shivam Mavi) याची निवड आश्चर्यचकित करणारी आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या 6 सामन्यांमध्ये 6 विकेट घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्याला न सांगताच बीसीसीआयने खांद्यावर दिली मोठी जबाबदारी! म्हणाला, ‘पप्पांनी मला मोबाईलवरून…’
भारताच्या वनडे संघातून बाहेर झाल्याने निराश ‘गब्बर’! इमोशनल पोस्ट व्हायरल