---Advertisement---

आयपीएल म्हणजे पैसे छापण्याचीच मशीन; मीडिया हक्कांमधून बीसीसीआय होणार मालामाल

On: मंगळवार, मार्च 29, 2022 7:55 PM
IPL
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीगमधून मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएलच्या मीडिया हक्कांसाठीची निविदा पुढील आठवड्यात खुली करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयकडे ४ निविदा आल्या आहेत. तसेच, अधिकारांसाठी बोली जूनच्या पहिल्या आठवड्यात लावण्यात येईल. आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलची बैठक २५ मार्च रोजी पार पडली. यामध्ये निर्णय घेण्यात आला की, प्रसारणकर्ते आणि ओटीटींना एकत्रितपणे बोली लावू दिली जाणार नाही. हे मीडिया हक्क २०२३ ते २०२७ या ५ वर्षांसाठी असतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हक्क पॅकेजमध्ये विभागले आहेत. त्यात पॅकेज ‘ए’ अंतर्गत टीव्ही हक्क, पॅकेज ‘बी’ अंतर्गत डिजिटल हक्क, पॅकेज ‘सी’ अंतर्गत अन्य श्रेणी आणि उर्वरित जगासाठी पॅकेज ‘डी’ यांचा समावेश आहे. या अधिकारांसाठीच्या निविदा पुढील आठवड्यात जाहीर केल्या जाऊ शकतात. सूत्रांनी स्पष्ट केले की, अन्य श्रेणीचे पॅकेज केवळ डिजिटल अधिकारांसाठी असू शकते आणि त्यासाठी १२ जून रोजी बोली लावली जाऊ शकते.

आयपीएलशी (IPL) संबंधित व्यक्तींनुसार, यावेळी बीसीसीआयला मीडिया हक्कांमधून ४० हजार कोटी रुपये मिळू शकतात. या अंतर्गत केवळ टीव्ही हक्कातून मिळणारी रक्कम २० हजार कोटींच्या पुढे जाऊ शकते. गेल्या पाच वर्षांत, डिजिटल हक्कांचा खर्च खूप वेगाने वाढला आहे आणि ते टीव्ही हक्कांमधून येणाऱ्या रकमेच्या अगदी जवळ येऊ शकतात. तसे, २०१७ मध्ये फेसबुकने डिजिटल हक्कांसाठी भूतकाळातील सर्वात मोठी बोली लावली होती. तेव्हा ही रक्कम ३९०० कोटी रुपये होती.

मात्र, बीसीसीआयच्या (BCCI) निर्णयानुसार लवकरच विलीन होणारी कंपनी सोनी आणि झी यांना आता स्वतंत्रपणे बोली लावावी लागणार आहे. तसेच, सोनी आणि ऍमेझॉनसोबत एकत्रितपणे बोली लावण्याची चर्चा होती. मात्र, आता त्यांना वेगळी बोली लावावी लागणार आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘माझी आई माझ्याशी २७ वर्षे खोटं बोलली’, असं का म्हणाला केएल राहुल?

‘एका शब्दानेही RCBने मला विचारलं नाही, असं कुठं असतं का?’ अखेर ‘त्याची’ दुखरी बाजू जगासमोर

“आमच्यासाठी तोच बेबी एबी”, केएल राहुलकडून २२ वर्षीय भारतीय युवा खेळाडूचे कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---