भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआय ह्या आठवड्यात मालामाल होणार आहे. याचे कारण म्हणजे भारतात पुढील पाच वर्षांमध्ये होणाऱ्या क्रिकेट मालिकांच्या मीडिया प्रक्षेपण हक्कासाठीचा ई-लिलाव सध्या सुरू आहे.
यात तीन दिग्गज कंपन्यांनी भाग घेतला असून गेले २ दिवस कुणीही माघार घेतली नाही. त्यामूळे हा पहिल्या दिवशी ४ हजार कोटींवर गेलेला ई-लिलाव काल संध्याकाळी ६ हजार कोटींवर गेला आहे.
पहिल्या दिवशी ४४४२ कोटींवर संध्याकाळी ६ वाजता हा लिलाव बंद झाला होता तो काल ६०३२.५० कोटींवर आला आहे.
यात स्टार इंडिया, जिओ आणि सोनी या आघाडीच्या कंपन्यांनी भाग घेतला आहे.
२०१२ रोजी स्टार टीव्हीने ३८५१ कोटींची बोली लावत प्रसरणाचे हक्क २०१२ ते २०१७ साठी मिळवले होते.
भारतात होणाऱ्या १०२ सामन्यांसाठी ही लिलाव प्रक्रिया सुरु असून यात जागतिक टीव्ही प्रसारण अधिकार, भारतातील प्रसारणाचे अधिकार, अशिया खंडातील प्रसारणाचे अधिकार तसेच डिझीटल अधिकारांचाही समावेश आहे.
Per match cost now at 56+ crores at e auction for BCCI rights. Still going
— Gaurav Kalra (@gauravkalra75) April 4, 2018
We are headed into day 3. Last bid is at 59+ crore per match.
— Gaurav Kalra (@gauravkalra75) April 4, 2018
आज हा लिलाव सकाळी ११ वाजता सुरु होणार आहे. आज या लिलावाचे संपुर्ण चित्र दुपारी ४ पर्यंत स्पष्ट होण्याची चिन्हं आहेत.