भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) हितसंबंधांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता या नव्या वादामूळे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी संकटात सापडण्याची शक्यता वर्तवली जाते. बिन्नी यांच्यावर आपल्या पदाचा वापर करून हितसंबंध जपल्याचा आरोप ठेवण्यात आहे. भारताच्या 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेले बिन्नी महिनाभरापूर्वीच बीसीसीआयचे अध्यक्ष बनले आहेत. बीसीसीआयचे एथिक्स ऑफिसर विनीत सरीन यांनी बिन्नी यांना याप्रकरणी नोटीस पाठवली आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सरीन यांनी हितसंबंधाच्या या मुद्द्यावर बिन्नी यांना 20 डिसेंबरपर्यंत लेखी जबाब देण्यास सांगितले आहे. या संपूर्ण प्रकरणात संजीव गुप्ता यांनी याचिका दाखल केली होती. बीसीसीआय अध्यक्ष असलेल्या बिन्नी यांची सून मयंती लँगर ही बीसीसीआयच्या देशांतर्गत क्रिकेटचे प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स या वाहिनीशी संलग्न आहे. त्यामुळेच इथे हितसंबंध जोपासले जात असल्याचे, याचिकेत म्हटले गेलेय. सरीन यांनी पाठवलेल्या नोटीसीमध्ये बिन्नी यांनी बीसीसीआय संविधानातील नियम 38 (1) व 38 (2) यांचे उल्लंघन केल्याचे सांगितले गेलेय.
मयंती ही प्रसिद्ध होस्ट असून, अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ती खेळाडूंची मुलाखत घेताना दिसते.
रॉजर बिन्नी यांची बिनविरोध बीसीसीआय अध्यक्षपद म्हणून निवड झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात त्यांनी हा पदभार सांभाळला आहे. ते असे पहिलेच बीसीसीआय अध्यक्ष आहेत, जे क्रिकेटपटूव्यतिरिक्त प्रशिक्षकही राहिले आहेत. त्यांनी 1983 विश्वचषकात 18 विकेट्स घेऊन भारतीय संघाला विजेतेपद जिंकण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्याप्रमाणे त्यांचा मुलगा स्टुअर्ट हा देखील भारतीय क्रिकेट संघासाठी खेळला आहे.
(BCCI President Roger Binny Get In Conflict Of Intrest Because Of Sister In Law Mayanti Langer)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रो कबड्डी: मुंबई-पुण्याचे पराभव; हरियाणा-गुजरातने मारली बाजी
भारत 41 वर्षांपूर्वीचा ‘हा’ नकोसा विक्रम पुन्हा करणार? गावसकरांपेक्षा धवनकडून जास्त अपेक्षा!