भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी विराजमान झाले आहेत. सध्या सुरू असलेल्या टी20 विश्वचषकातील खेळाडू आणि देशांविषयीचे त्यांचे वक्तव्य चर्चेत आहे. त्यांनी नुकतेच भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याचे तोंडभरून कौतुक केले होते. विराटच्या नाबाद 82 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2022मधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला 4 विकेट्सने पराभूत केले होते. भारतानंतर पाकिस्तान संघ झिम्बाब्वेविरुद्धही 1 धावेने पराभूत झाला होता. यानंतर पाकिस्तानच्या उपांत्य सामन्यात स्थान मिळवण्याची शक्यता धूसर झालीये. यावर आता बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी भविष्यवाणी केलीये.
झिम्बाब्वेच्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाबद्दल बोलताना बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी (BCCI President Roger Binny) यांनी म्हटले की, पाकिस्तानसाठी अंतिम चारमध्ये स्थान मिळवणे कठीण होईल.
काय म्हणाले रॉजर बिन्नी?
रॉजर बिन्नी (Roger Binny) यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, “ज्युनिअर संघ पुढे येतायेत, हे चांगले आहे. झिम्बाब्वे आणि आयर्लंड संघांनी या टी20 विश्वचषकात हे स्पष्ट केले आहे. आता तुम्ही छोट्या संघांनाही हलक्यात घेऊ शकत नाही. ते तुम्हाला सहजरीत्या पराभूत करू शकतात. मला वाटते की, पाकिस्तानसाठी उपांत्य सामन्यात पोहोचणे कठीण होईल. असे झाले, तर हे माझ्यासाठी आनंदाची बाब असेल, परंतु क्रिकेट हा एक मजेशीर खेळ आहे. तुम्हाला माहिती नाहीये, यात कधीही काहीही होऊ शकते.”
पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स
बाबर आझम (Babar Azam) याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाने टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेतील आपला तिसरा सामना रविवारी (दि. 30 ऑक्टोबर) नेदरलँड्सविरुद्ध खेळला. या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सला 9 विकेट्स गमावत 91 धावांवर रोखले. पराभव टाळण्यासाठी त्यांच्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. हा सामना पाकिस्तानने 6 विकेट्सने आपल्या नावावर केला.
सन 2009 मधील टी20 विश्वचषक पाकिस्तान संघाने जिंकला होता. आता 2022च्या टी20 विश्वचषकात पाकिस्तान सुपर 12 फेरीतील दुसऱ्या गटाच्या गुणतालिकेत नेदरलँड्सच्या वर आहे. तसेच, रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ या गटात दोन सामने जिंकत गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. संघाचा तिसरा सामना रविवारी (दि. 30 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“जर रिषभ पंत पाकिस्तानात असता, तर वर्ल्डकपमधून कधीच बाहेर बसवलं नसतं”
पाकिस्तानी दिग्गजाचा खळबळजनक खुलासा! म्हणाला, ‘ड्र’ग्जने आयुष्य उद्ध्वस्त केले, पत्नीच्या मृत्यूने…’