विराट कोहलीचा फॉर्म सध्या क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय बनला आहे. त्याच्या संघात असण्याने अनेक आजीमाजी खेळाडूंनी टिकाही केली आहे, त्यामध्ये काहींनी त्याला विश्रांती घ्यावी असे सुचविले आहे. तर काही खेळाडूंनी त्याची पाठराखण केली आहे. यामध्ये आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी उडी घेतली आहे. गांगुली यांनी विराटची बाजू घेत टीकाकरांना आणि चाहत्यांना उत्तर दिले आहे.
सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी म्हटले, “विराट लवकरच फॉर्ममध्ये परतणार आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या आहेत. त्याच्याकडे तशी गुणवत्ता आहे म्हणून त्याच्या बॅटमधून एवढ्या धावा निघाल्या आहेत.”
सध्या गांगुली लंडनमध्ये असून त्याने माध्यमांशी बोलताना म्हटले, “विराटची आकडेवारी एकदा पाहिली की त्यावरून कळून येते तो किती मोठा आणि महत्वाचा फलंदाज आहे ते. तो भारताचा नेहमीच महान खेळाडू राहिला आहे.”
विराटला स्वत:ला माहित आहे की तो मागील काही सामन्यांपासून धावा करू शतक नाहीये. असे प्रथमच होत असून त्याबाबत वाईटही वाटत आहे. यासाठी त्याला एक मार्ग शोधावा लागेल आणि लयीत परत यावे लागेल. मागील १२-१३ वर्षापासून तो उत्तम कामगिरी करत यशस्वी झाला आहे हे काही सोपे काम नाही.
खेळाडूंचा फॉर्म जाणे हे खेळात होतच असते. असे अनेक महान क्रिकेटपटूंच्यासोबतही घडले आहे. यामुळे विराट हा काही पहिलाच खेळाडू नाही जो वाईट फॉर्ममध्ये आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड हे पण त्याच्या कारकिर्दीत खराब फॉर्ममधून गेले आहेत. अशावेळी खेळाडूंनी निराश न होता आपला नैसर्गिक खेळ करत राहावा, असेही गांगुली यांनी म्हटले आहे.
विराट कोहली (Virat Kohli) आणि गांगुली यांच्यात मागील वर्षी झालेल्या टी२० विश्वचषकानंतर वाद झाला होता. त्यावेळी विराटला मर्यादीत षटकाच्या संघाच्या कर्णधारपदावरून हटवले गेले होते. दोघांच्या या वादामुळे भारतीचे क्रिकेटचे वातावरण थोडे अशांतही झाले होते. पण आता सर्वकाही ठिक असून दोघांमधील सबंधही सुधारले आहेत.
आयसीसी वनडे फलंदाजाच्या क्रमवारीत विराट तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत ७० आंतरराष्ट्रीय शतके केली असून त्याच्या ७१व्या शतकाची वाट चाहते चातकासारखी पाहत आहेत.
विराटने १०२ कसोटीमध्ये ८०७४, २६० वनडेत १२३११ आणि ९९ टी२० सामन्यांत ३३०८ धावा केल्या आहेत. या तिन्ही प्रकारामध्ये त्याची सरासरी ५०च्या आसपास आहे. सध्या तो इंग्लंड दौऱ्यात वनडे मालिकेत खेळत आहे. तर त्याला आगामी वेस्ट इंडीजच्या टी२० आणि वनडे मालिकेमधून वगळले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WIvsIND: आयर्लंडविरुद्धच्या दमदार प्रदर्शनानंतरही संजूकडे दुर्लक्ष, चाहत्यांकडून निवडकर्त्यांवर टीका
बीसीसीआयने पुन्हा तोडली ‘या’ फिरकीपटूंची जोडी; एकाला संघात घेताच दुसऱ्याला ‘विनाकारण’ बसवलं