भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. टी२० विश्वचषक २०२१ पूर्वी त्याने टी२० संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर, आयपीएलमध्येही त्याने अखेरच्या वेळी आरसीबीचे नेतृत्व केले. तर, दक्षिण आफ्रिका दौर्याआधी त्याला वनडे संघाचा कर्णधारपदावरूनही बाजूला करण्यात आले. तसेच, आता त्याने स्वत: कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आता त्याच्याशी निगडित आणखी एक वाद समोर आला आहे. (Virat Kohli Step Down As Captain)
गांगुली देणार होते विराटला कारणे दाखवा नोटीस
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) हे विराट कोहली याला कारणे दाखवा नोटीस बजावणार होते, असे वृत्त माध्यमांमधून येत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, विराटने दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्याने खुलासा केला होता की, टी२० कर्णधारपद सोडताना त्याला कोणीही रोखले नव्हते. (Ganguly Wanted Show Cause Notice To Virat Kohli)
विराटने टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर गांगुली म्हणाले होते की, आम्ही त्याला कर्णधारपद न सोडणेविषयी विनंती केली होती. मात्र, विराटने पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यामुळे गांगुली खोटे पडले होते. याच कारणाने त्यांनी विराटला कारणे दाखवा नोटीस देण्याची तयारी केलेली. यासंबंधी त्यांनी बीसीसीआयमधील अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली होती. मात्र, इतर अधिकाऱ्यांनी गांगुली यांना असे करण्यापासून रोखले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर करताना निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनीदेखील गांगुली यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला होता. (Virat Kohli Press Conference)
विराटने कसोटी संघाचे सोडले नेतृत्व
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाला २-१ असा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर विराटने तडकाफडकी आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्याने, तिसरा सामना संपल्यानंतर संघ सहकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने आपला निर्णय सर्वांसमोर जाहीर केला. विशेष म्हणजे यानंतर गांगुली यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या सामन्यात कोठे शिंकली माशी? जाणून घ्या भारताच्या पराभवाची चार कारणे (mahasports.in)
गब्बरने सांगितले निराशेतून बाहेर येण्याचे गुपित; म्हणाला, “या गोष्टी आयुष्यात…” (mahasports.in)