माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली पुन्हा एकदा मैदानात चौकार आणि षटकार लगावताना दिसणार आहे. एका मैत्रीपूर्ण सामन्यादरम्यान तो मैदानात उतरताना दिसणार आहे. हा सामना बीसीसीआय सचिव जय शहा यांचा संघ आणि मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुलीच्या संघात होणार आहे. हा मैत्रीपूर्ण सामना अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये बीसीसीआयच्या सर्वसाधारण बैठकीच्या अगोदर खेळला जाईल.
या सामन्यासाठी आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला हे रेफरी असणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार हा सामना 23 डिसेंबरला खेळला जाणार आहे. सर्वसाधारण बैठकीसाठी बीसीसीआयचे इलेक्टोरल बोर्डाचे मेंबरही उपस्थित राहतील आणि ते सुद्धा टेनिस चेंडूच्या सराव सामन्यात भाग घेतील.
मोटेराचे स्टेडियम नुकतेच बांधून तयार झाले आहे आणि हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. यामध्ये 1,10,000 लोकांची बसण्याची क्षमता आहे. परंतु या स्टेडियमवर अजून कोणत्याही सामन्याचे आयोजन केलेले नाही. जेव्हा फेब्रुवारीमध्ये इंग्लंडचा संघ भारतीय दौर्यावर येईल तेव्हा या ठिकाणी सामन्याचे आयोजन केले जाणार आहे.
बीसीसीआयच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये होणार बर्याच विषयांवर चर्चा
बीसीसीआयच्या 89 व्या सर्वसाधारण बैठकीमध्ये भारतीय क्रिकेटबद्दल बर्याच विषयावर चर्चा केली जाणार आहे. इंग्लंडच्या भारतीय दौऱ्याची तयारी, रणजी सामन्याची पुन्हा सुरुवात आणि आयपीएलच्या पुढील सत्रात दोन नवीन संघाचा होणारा समावेश याबद्दल बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.
यापूर्वी असे वृत्त होते की, अहमदाबादला आयपीएलमध्ये नवीन संघ मिळू शकतो. अहमदाबाद येथे बनलेल्या जागतिक दर्जाच्या स्टेडियममुळे बीसीसीआय येथे जास्त आयपीएल सामन्याचे आयोजन करण्याचा प्रयत्न करत आहे. अहमदाबाद शिवाय पुणे, कानपूर, गुवाहाटी आणि लखनऊ सारखी शहरे दुसरी फ्रँचायझी बनण्याच्या शर्यतीत आहेत.
मांडण्यात येणार गुवाहाटी संघाचा प्रस्ताव
स्थानिक वृत्तानुसार, आसाम क्रिकेट असोसिएशनचे सचिव देवजीत लोन सैकिया बीसीसीआयच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये गुवाहाटी संघाचा प्रस्ताव मांडणार आहेत. परंतु इनसाइड स्पोर्ट्सच्या बातमीनुसार गुवाहाटीला 2021 आयपीएलसाठी संघ मिळणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
“तुझ्या गुगल्या राखून ठेव”, चहलला लग्नानंतर शुभेच्छा देत केले रोहितने ट्रोल
युवराज सिंग नाही, तर ‘या’ भारतीय दिग्गजाने ठोकल्यात एका षटकात सर्वाधिक धावा
‘अजिंक्य रहाणे गोलंदाजांचा कर्णधार’, संघ सहकाऱ्याने उधळली स्तुतिसुमने