आयपीएल 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होत आहे. लिलावाच्या पहिल्याच दिवशी एक मोठी बातमी समोर आली. ही बातमी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांच्याशी संंबंधीत आहे.
वास्तविक, जय शाह यांच्या घरी तिसऱ्यांदा पाळणा हलला आहे. त्यांची पत्नी ऋषिता पटेल यांनी मुलाला जन्म दिला. जय शाह आधीच दोन मुलींचे पिता आहेत. रविवार 24 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियामध्ये आयपीएल 2025 मेगा लिलावादरम्यान ही आनंदाची बातमी संपूर्ण देशाला मिळाली.
आयपीएल लिलावादरम्यान चेअरमन अरुण धुमाळ यांनी जय शाह यांच्या मुलाच्या जन्माची बातमी शेअर केली. याची घोषणा करताना धुमाळ यांनी जय शाह यांचं अभिनंदन केलं. त्यांनी शाह यांचं ‘भारताचा मैदानाबाहेरचा कर्णधार’ असं वर्णन केलं. ते म्हणाले, “मी भारताचे मैदानाबाहेरचे कर्णधार जय शाह याचं मुलाच्या जन्माबद्दल अभिनंदन करतो.”
जय शाह डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांची न्यूझीलंडच्या ग्रेग बार्कले यांच्या जागी आयसीसीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे, कारण बऱ्याच काळानंतर भारतीय व्यक्तीला हे महत्त्वाचं पद भूषवण्याची संधी मिळाली आहे.
जय शाह यांनी 2009 मध्ये गुजरात क्रिकेट प्रशासनात आपला प्रवास सुरू केला होता. ऑक्टोबर 2019 मध्ये बीसीसीआयचे सचिव झाल्यानंतर त्यांनी भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेलं. 2021 ते 2024 पर्यंत आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रादेशिक क्रिकेटच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हेही वाचा –
IPL Mega Auction; दिग्गज फिरकीपटू खेळणार धोनीच्या संघातून, 9.75 कोटीला केले खरेदी
मोहम्मद शमीला 10 कोटी तर मिलरवर 7.5 कोटी रुपयांची बोली! या संघांकडून खेळताना दिसणार हे दिग्गज
केएल राहुलला मिळाले अवघे 14 कोटी रुपये! आरसीबी नाही तर या संघाने लावली सर्वात मोठी बोली