भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी आपल्या उदारतेनं सर्वांची मनं जिंकली आहेत. ते बार्बाडोसमध्ये अडकलेल्या भारतीय क्रिकेट संघासह भारतीय पत्रकारांना देखील मायदेशी आणण्यात मदत करत आहेत. भारतीय संघासोबत अनेक भारतीय पत्रकारही बार्बाडोसमधील वादळात अडकले होते, ज्यांच्यासाठी जय शाह यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
बीसीसीआयचं विशेष विमान बार्बाडोसहून सर्वांना घेऊन दिल्लीला पोहोचणार आहे. बेरिल चक्रीवादळामुळे फायनलच्या दुसऱ्या दिवशी (30 जून) बार्बाडोसमध्ये हाय अलर्ट होता. त्यामुळे भारतीय संघ तसेच सपोर्ट स्टाफ आणि मीडिया कर्मचारी देखील तिथेच अडकले. हाय अलर्टमुळे विमानतळही बंद करण्यात आलं होतं. आता अनेक क्रीडा पत्रकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जय शाह यांचे आभार मानले आहेत. ते बार्बाडोसमध्ये अडकलेल्या भारतीय पत्रकारांना आपल्यासोबत कसं आणणार हे सांगत आहेत.
बार्बाडोसहून दिल्लीला येणारं विमान गुरुवारी, 4 जून रोजी सकाळी दिल्लीला पोहोचेल. टीम इंडिया दिल्लीला पोहोचल्यानंतर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. यानंतर भारतीय संघ मुंबईत वर्ल्डकप ट्रॉफीसह खुल्या बसमधून सिटी टूर करण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2007 मध्ये भारतानं टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर अशा प्रकारे सिटी टूर करण्यात आली होती. त्यानंतर आता तब्बल 17 वर्षांनंतर हे पुन्हा घडणार आहे.
विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयनं भारतीय संघाला भरघोस रकमेचं बक्षीस जाहीर केलं आहे. टीम इंडिया, संपूर्ण सपोर्ट स्टाफ तसेच निवडकर्ते यांना 125 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहे. जय शाह यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
2024 टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे होता –
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराज
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान
महत्त्वाच्या बातम्या –
स्वप्न सत्यात उतरलं; झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड झाल्यानंतर युवा खेळाडूंची पहिली प्रतिक्रिया समोर
“मरणाच्या दारापासून ते टी20 विश्वचषक विजेता”, पाहा रिषभ पंतचा प्रेरणादायी प्रवास
‘टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन भारताचे स्वागत’ झिम्बाब्वे क्रिकेटने केले टीम इंडियाचे खास पद्धतीने कौतुक






