भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक मागील जवळपास दोन वर्षांपासून अत्यंत व्यस्त असलेले दिसून येते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आयपीएल व देशांतर्गत क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याने काही मालिकांना अद्याप वेळ मिळालेला नाही. मागील जवळपास दोन वर्षांपासून भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान मालिका खेळण्याचा विचार सुरू आहे. मात्र, भारतीय संघाच्या वेळापत्रकामुळे ही मालिका अद्याप खेळली गेली नाही. असे असतानाच आता बीसीसीआय सचिव जय शहा यांनी या मालिकेबाबत एक मोठी घोषणा केली आहे.
मागील वर्षी फेब्रुवारी मार्च महिन्या दरम्यान ही कसोटी मालिका खेळण्याचा प्रस्ताव अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आलेला. यावर बीसीसीआयने विचार करण्यास काही वेळ मागितलेला. ही मालिका मागील वर्षी जुलै महिन्यात खेळण्याचा विचार केला. मात्र, त्यानंतर भारतीय संघाच्या वेळापत्रकामुळे ही मालिका होऊ शकली नाही. त्यानंतर, जून महिन्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघ जवळपास महिनाभर कोणतीही मालिका खेळणार नव्हता. त्यामुळे ही मालिका होण्याची शक्यता वाढलेली. परंतु, दोन्ही बोर्डांच्या परस्पर संमतीने ही मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला.
नुकत्याच झालेल्या बीसीसीआय बैठकीत या मालिकेविषयी चर्चा झाली असून, बीसीसीआय सचिव जय शहा यांनी ही मालिका पुढील वर्षी खेळली जाणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. ही मालिका वनडे विश्वचषकाच्या आधी होण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली. त्यानंतर आता ही मालिका पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होऊ शकते. या मालिकेत तीन वनडे सामने खेळले जातील. भारतीय संघ या मालिकेचे यजमानपद भूषवेल.
(BCCI Secretary Jay Shah Confirmed India Afghanistan Series Next Year)
महत्वाच्या बातम्या-
लीड्समधील न्हाव्याचा कांगारू खेळाडूवर मोठा आरोप! म्हणाला, ‘त्याने पैसे देण्याचे वचन दिले पण…’
फास्ट बॉलर्ससाठी गुड न्यूज! बीसीसीआयच्या निर्णयामुळे महत्वाच्या स्पर्धेत मिळणार फायदा