दुबई| रविवारी (28 ऑगस्ट) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने 5 विकेट्स राखून धमाकेदार विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला 19.5 षटकात 147 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात भारताने 19.4 षटकात 5 विकेट्सच्या नुकसानावर पाकिस्तानचे लक्ष्य पूर्ण केले. या सामन्यादरम्यान बीसीसीआय सचिव जय शहा चर्चेचा विषय ठरले. त्यांना सामन्यादरम्यान असे काही करताना पाहिले गेले, ज्यामुळे चाहत्यांचा त्यांच्यावर पारा चढला आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत जय शहा (Jay Shah) भारताचा राष्ट्रध्वज (Indian Flag) हाती घेण्यास नकार देताना दिसत आहेत. याचमुळे चाहत्यांनी जय शहांवर निशाणा (Fans Trolled Jay Shah) साधला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, भारत आणि पाकिस्तान संघातील सामना पाहण्यासाठी बीसीसीआय सचिव जय शहा दुबईला पोहोचले आहेत. इतर चाहत्यांप्रमाणेही तेही स्टेडियममध्ये भारताला चियर करताना दिसले. पाकिस्तानच्या 148 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पंड्याने 19.4 षटकात खणखणीत षटकार मारत संघाला सामना जिंकून दिला. यानंतर जय शहा यांनी टाळ्या वाजवत जोरदार जल्लोष साजरा केला.
भारताचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांचे सेलिब्रेशन #INDvsPAK #AsiaCup2022
pic.twitter.com/3pzfNf9zZL— Shrimant Mane (@ShrimantManey) August 28, 2022
जल्लोष साजरा करत असताना एक व्यक्ती तिरंगा झेंडा घेऊन जय शहांना तो झेंडा देण्यासाठी आला. परंतु जय शहांनी झेंडा हाती घेण्यास नकार (Jay Shah Denied Indian Flag) दिला. हीच कृती त्यांना महागात पडली आहे. यावरून चाहते जय शहांना ट्रोल करत आहेत.
जय शहा ला हातामध्ये तिरंगा घेईला लाज वाटत आहे का.. pic.twitter.com/W95BWAQATl
— Rupaligaikwad @1987.com (@Rupalig27393182) August 28, 2022
एकीकडे भारताचा राष्ट्रध्वज हातात घेयला ह्यांना लाज वाटते आणि दुसरी कडे देशभक्ती चे धडे शिकवतात वाह रे तुमची देशभक्ती 😡😡😡 pic.twitter.com/xG9kubsv1S
— Shubham Jatal (@ShubhamJatalNcp) August 28, 2022
एका चाहतीने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, “जय शहाला हातामध्ये तिरंगा घेईला लाज वाटत आहे का?” तर एका चाहत्याने जय शहांचे वडील आणि भारताचे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला आहे. “एकीकडे भारताचा राष्ट्रध्वज हातात घ्यायला यांना लाज वाटते आणि दुसरीकडे देशभक्तीचे धडे शिकवतात. वाह रे तुमची देशभक्ती.” अशी प्रतिक्रिया देताना त्या चाहत्याने पुढे रागाचे इमोजी जोडले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-पाक सामन्यात चहलच्या नावावर नकोसा विक्रम! इफ्तिकारने मारलेला षटकार पडला महागात
तिकडे पाकिस्तान हारत होता, इकडे आझम फक्त रडायचा बाकी होता! ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
दमदार प्रदर्शन करूनही भुवनेश्वर ऐवजी हार्दिकला का मिळाला सामनावीर पुरस्कार? जाणून घ्या