आशिया कपसाठी बीसीसीआयचा मास्टर प्लॅन! आणखी चार ‘दमदार’ खेळाडूंना पाठवले युएईत

आशियातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया चषकाला शनिवारी (२७ ऑगस्ट) सुरुवात होत आहे. या स्पर्धेत गतविजेत्या भारताला पुन्हा एकदा विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.‌ भारताच्या प्रमुख संघासह चार खेळाडूंना राखीव म्हणून देखील निवडले गेलेय. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आणखी एक मोठा निर्णय घेत भारतीय संघाला सहाय्य केले आहे.

आशिया चषकासाठी भारतीय संघाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, रविवारी (२८ ऑगस्ट) भारत आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध अभियानाची सुरुवात करेल. या सामन्यापूर्वी भारतीय संघात आणखी चार खेळाडूंचा समावेश झाला आहे. नुकतीच बातमी आली होती की, राजस्थान रॉयल्स कडून यावर्षी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलेला मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज कुलदीप सेन याला युएई येथे पाठवण्यात आले आहे. तो नेट बॉलर म्हणून भारतीय खेळाडूंना गोलंदाजी करेल. आता त्याच्या व्यतिरिक्त आणखी तीन जणांचा नेट बॉलर म्हणून भारतीय पथकात समावेश केला गेला आहे. कुलदीप व्यतिरिक्त पंजाब साठी खेळलेला अष्टपैलू फिरकीपटू हरप्रीत ब्रार, युवा फिरकीपटू एम सिद्धार्थ व युवा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ शर्मा यांना देखील युएईला पाठवले गेले आहे. या अशा दर्जेदार खेळाडूंमुळे भारतीय फलंदाजांना मदत होईल असे, बीसीसीआयचे म्हणणे आहे.

आशिया चषक २०२२ साठी भारत संघ: 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
स्टँडबाय: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

आयसीसीच्या ‘१००% सुपरस्टार’ यादीत स्म्रिती मंधानाचा समावेश, इतर चौघींची नावेही घ्या जाणून
मुंबईचे क्रीडापटू मयूर व्यास यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’च्या ‘लाइफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड्स’ ने गौरव
सरावानंतर विराट भेटला पाकिस्तानच्या फॅनला, व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Related Articles