टी -२० विश्वचषकानंतर भारतीय संघ विविध देशांविरुद्ध यजमानपद भूषवत क्रिकेट मालिका खेळणार आहे. टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये आयोजित केला जाणार आहे. या आयसीसी स्पर्धेत भारत आपला पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.
या जागतिक स्पर्धेनंतर भारतीय संघ न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवेल. भारताच्या या मालिकेचे वेळापत्रक आधीच तयार केले गेले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा २० सप्टेंबर रोजी संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर केली जाऊ शकते.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १७ नोव्हेंबरपासून तीन टी-२० आणि दोन कसोटी सामने खेळले जातील. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. भारत श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी आणि तीन टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळेल. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळेल. बीसीसीआयने टी-२० विश्वचषकानंतर होणाऱ्या भारताच्या घरच्या मालिकेचे वेळापत्रक आधीच तयार केले आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड
पहिला टी -२० सामना – १७ नोव्हेंबर, जयपूर
दुसरा टी -२० सामना – १९ नोव्हेंबर, रांची
तिसरा टी -२० सामना – २१ नोव्हेंबर, कोलकाता
पहिली कसोटी – २५-२९ नोव्हेंबर, कानपूर
दुसरी कसोटी – ०३-०७ डिसेंबर, मुंबई
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (२०२२)
पहिला एकदिवसीय – ०६ फेब्रुवारी, अहमदाबाद
दुसरी एकदिवसीय – ०९ फेब्रुवारी, जयपूर
तिसरा एकदिवसीय – १२ फेब्रुवारी, कोलकाता
पहिला टी -२० सामना – १५ फेब्रुवारी, कटक
दुसरा टी -२० सामना – १८ फेब्रुवारी, विशाखापट्टणम
तिसरा टी -२० सामना – २० फेब्रुवारी, त्रिवेंद्रम
भारत विरुद्ध श्रीलंका (२०२२)
पहिली कसोटी – २५-०१ मार्च, बेंगळुरू
दुसरी कसोटी- ०५-०९ मार्च, मोहाली
पहिला टी -२० सामना – १३ मार्च, मोहाली
दुसरा टी -२० सामना – १५ मार्च, धर्मशाला
तिसरा टी -२० सामना – १८ मार्च, लखनऊ
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०२२)
पहिला टी -२० सामना – ०९ जून, चेन्नई
दुसरा टी -२० सामना – १२ जून, बेंगळुरू
तिसरा टी -२० सामना – १४ जून, नागपूर
चौथा टी -२० सामना – १५ जून, राजकोट
पाचवी टी -२० सामना – १९ जून, दिल्ली