---Advertisement---

केएल लागला तयारीला! दुसऱ्या वनडेत दम दाखवायला उपकर्णधार उत्सुक

On: सोमवार, फेब्रुवारी 7, 2022 8:22 PM
kl-rahul
---Advertisement---

अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज (INDvWI ODI Series) या संघांमध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. रविवारी (६ फेब्रुवारी) झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना ९ फेब्रुवारी रोजी याच नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळला जाईल. तत्पूर्वी, भारतीय संघाच्या सराव सत्राची काही छायाचित्रे बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केली आहेत.

बीसीसीआयने शेअर केली छायाचित्रे

पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी पुन्हा सरावासाठी मैदानात पाऊल ठेवले. या सराव सत्राची काही छायाचित्रे बीसीसीआयने शेअर केली आहेत. यामध्ये संघाचा नियमित उपकर्णधार केएल राहुल, सलामीवीर मयंक अगरवाल व वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हे सराव करताना दिसून आले.

 

राहुल पहिल्या सामन्यासाठी संघाचा भाग नव्हता. आपल्या बहिणीच्या लग्नासाठी त्याने या सामन्यातून माघार घेतली होती. तर, मयंक याला शिखर धवन व ऋतुराज गायकवाड हे दोन्ही सलामीवीर कोरोना पॉझिटिव्ह आल्याने अखेरच्या क्षणी संघात सामील करण्यात आलेले. त्याला तीन दिवस विलगीकरणात रहावे लागले होते. शिखर व ऋतुराज यांच्यासह कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या नवदीप सैनीने यातून सावरत पुन्हा मैदानावर पुनरागमन केले आहे.

दुसऱ्या सामन्यासाठी संघात होणार बदल

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात सोपा विजय मिळवला असला तरी, दुसऱ्या सामन्यात संघात बदल होणे निश्चित आहे. केएल राहुल परतल्याने ईशान किशन याला बाहेर बसावे लागेल. तर, शार्दुल ठाकुर याच्या जागी दीपक चहरला संधी दिली जाऊ शकते. हा सामना ९ फेब्रुवारी रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल.

दुसऱ्या सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, दीपक हूडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा व मोहम्मद सिराज.

महत्वाच्या बातम्या-

चहल यंदा दिसणार मुंबई इंडियन्सकडून खेळताना? रोहितबरोबरच्या त्या व्हिडिओनंतर चर्चांना उधान 

गेल्या १६ वनडेत दहाव्यांदा विंडीजचा संघ सर्वबाद; अष्टपैलू होल्डर म्हणाला, ‘आम्हाला विकेट्सचे महत्त्व…’

पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर दीपक हुडा झाला इमोशनल; म्हणाला, ‘विराट भैय्याकडून कॅप मिळणे…’

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---