संयुक्त अरब अमिराती येथे होत असलेल्या टी२० विश्वचषकात यजमान भारतीय संघ साखळी फेरीतून स्पर्धेबाहेर पडला. विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून स्पर्धेत सहभागी झालेला भारतीय संघ पाकिस्तान व न्यूझीलंड करून पराभूत झाल्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकू शकला नाही. आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात नामिबियाला ९ गड्यांनी पराभूत करत भारतीय संघाने शेवट गोड केला. याचबरोबर रवी शास्त्री यांचा भारतीय संघासोबतचा प्रवास संपुष्टात आला. या सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये शास्त्री यांनी अखेरच्या वेळी भारतीय संघाला संबोधित करत सर्वांना मिठी मारून अलविदा केला.
अखेरच्या वेळी केले संघाला संबंधित
रवी शास्त्री यांनी विश्वचषकापूर्वीच आपण र अखेरच्या वेळी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवत असल्याचे जाहीर केले होते. त्यांची ही अखेरची स्पर्धा संस्मरणीय होऊ शकली नाही व भारतीय संघाला स्पर्धेतून लवकर बाहेर पडावे लागले. नामिबियाविरुद्धच्या विजयानंतर त्यांनी अखेरच्या वेळी भारतीय संघासोबत वेळ घालवला. त्यांनी या दरम्यान भारतीय संघाला संबोधित केले. त्या संबोधनाचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
शास्त्री या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत की,
“तुम्ही सर्वांनी एक संघ म्हणून इतके काही मिळवले आहे ज्याचा मी विचारही केला नव्हता. मागील काही वर्षात तुम्ही संपूर्ण जगभरात ज्या पद्धतीने क्रिकेट चे तीनही प्रकार खेळला, ते तुम्हाला एक संघ म्हणून खूप बनवते.”
या नंतर रवी शास्त्री यांनी तसेच संपूर्ण सपोर्ट स्टाफने एकमेकांना मिठी मारत अखेरच्या वेळी ड्रेसिंग रूम शेअर केली.
Must Watch: A stirring speech to sign off as the #TeamIndia Head Coach 👏 👏
Here's a snippet from @RaviShastriOfc's team address in the dressing room, reflecting on the team's journey in the last few years. 👍 👍 #T20WorldCup #INDvNAM
Watch 🎥 🔽https://t.co/x05bg0dLKH pic.twitter.com/IlUIVxg6wp
— BCCI (@BCCI) November 9, 2021
दैदिप्यमान राहिली कारकीर्द
रवी शास्त्री हे २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने दोन वेळा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा कारनामा केला आहे. ते २०१५-२०१६ मध्ये भारतीय संघाचे संचालक म्हणून देखील कार्यरत होते. शास्त्री यांच्यासोबतच गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनीदेखील भारतीय संघापासून फारकत घेतली.