अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जाते. या स्टेडियमची बांधणी १९८२ साली करण्यात आलेली होती. परंतु आता त्याचे नूतनीकरण करून नव्या ढंगात त्याची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. आज (२६ जानेवारी) या नव्या स्टेडियमवर पहिलाच अधिकृत क्रिकेट सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर स्टेडियमच्या भव्यतेचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सय्यद मुश्ताक अली टी20 च्या बाद फेरीतील कर्नाटक विरुद्ध पंजाबचा सामना आज या मैदानावर खेळला गेला. सामन्यादरम्यान बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे या स्टेडियमची भव्यता दिसून येते.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडपेक्षाही हे स्टेडियम मोठे आहे. हे स्टेडियम गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत येते. प्रेक्षकांच्या दृष्टीने येथे एक लाख दहा हजार प्रेक्षक बसू शकतात. याशिवाय येथे कॉर्पोरेट बॉक्स, पार्किंग आणि खेळाडूंसाठी विविध सुविधा असणार आहेत. मोटेरा स्टेडियमला खऱ्या अर्थाने अत्याधुनिक स्टेडियम म्हणता येईल. कारण येथे पावसाळ्यातही सामने पार पडण्याची व्यवस्था केलेली आहे.
Grand ✅
Superbly equipped ✅Welcome to the Motera – the biggest cricket stadium in the world. ???????? @GCAMotera | #SyedMushtaqAliT20 pic.twitter.com/KoNodrgcMf
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 26, 2021
आगामी काळात या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात होणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर येत असून, चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा व चौथा कसोटी सामना याच मैदानावर खेळणार आहे. विशेष म्हणजे तिसरा कसोटी सामना गुलाबी चेंडूने दिवस-रात्र प्रकारात खेळला जाणार आहे. सर्व क्रिकेटप्रेमींना या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना बघण्याची उत्सुकता लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ कारणामुळे कुलदीप ऐवजी सुंदरला दिली संघात जागा; अजिंक्य रहाणेने उलगडले रहस्य
“… तरच पृथ्वी शॉ करू शकेल भारतीय संघात पुनरागमन, इयान बिशप यांनी सांगितला पर्याय
“भारताविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांसमोर असेल ‘हे’ मोठे आव्हान”






