कोरोनानंतर भारतीय संघ यावर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. या दौर्यावर दोन्ही देशांमध्ये ३ सामन्यांची टी२० व वनडे मालिका आणि ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. सध्या संयुक्त अरब अमिरातीत असलेले भारतीय खेळाडू आणि सहयोगी कर्मचारी १३ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. तत्पूर्वी बीसीसीआयने भारतीय संघाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सर्व खेळाडू काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहेत. अनेकांनी मास्क घालून फोटो काढले आहेत. खेळाडूंसोबत संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनीही तो पोशाख परिधान केला आहे. बीसीसीआयने भारतीय संघाचे फोटो शेअर करत त्याला भन्नाट असे कॅप्शनही दिले आहे.
#TeamIndia is BACK!
Let's embrace the new normal 💪#AUSvIND pic.twitter.com/csrQ3aVv21
— BCCI (@BCCI) November 11, 2020
असे आहे वेळापत्रक
ऑस्ट्रेलिया दौर्यावर भारताला चार कसोटी, तीन वनडे आणि तीन टी२० सामने खेळायचे आहेत. या दौर्याची सुरुवात वनडे सामन्याने होईल. हे तीनही वनडे सामने २७ नोव्हेंबर, २९ नोव्हेंबर आणि २ डिसेंबर रोजी खेळले जातील.
त्यानंतर तीन टी२० सामने ४, ६ आणि ८ डिसेंबर रोजी खेळले जातील, तर पहिला कसोटी सामना १७ डिसेंबरपासून सुरू होईल. वेळापत्रकानुसार ऍडलेडमध्ये भारत पहिला दिवस- रात्र कसोटी सामना खेळेल, तर मेलबर्नमध्ये २६ डिसेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान दोन्ही संघ बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळतील. १९ जानेवारी रोजी चौथ्या कसोटी सामन्याने हा दौरा संपेल.
टी२० मालिकेसाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, टी नटराजन
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रिषभ पंत (विकेट- कीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
कोच रवी शास्त्री अध्यक्ष गांगुलीचे नाव विसरले की जाणून बुजून घेतलं नाही?
दिल्लीने मुंबईला हिरा दिला हिरा! ‘या’ हुकमी गोलंदाजावर रोहित शर्माने केला कौतुकाचा वर्षाव
प्रसिद्ध टॉलीवूड अभिनेत्रीसोबत डेविड वॉर्नरचा भन्नाट डान्स, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०मधील ५ खेळाडू; ज्यांनी सिंहाचा वाटा उचलत गाजवले मैदान
रामराम आणि पुन्हा भेटू! आयपीएल २०२० ला अलविदा करत असताना एक नजर या स्पर्धेतील महत्वाच्या घटनांवर