भारतीय संघ येत्या जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ते तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दरम्यान भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्याने युवा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या संघाचे कर्णधारपद शिखर धवनकडे आणि प्रशिक्षकपद राहुल द्रविडकडे देण्यात आले आहे. श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
बीसीसीआयने शेअर केला फोटो
श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी शिखर धवन आणि राहुल द्रविड यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. यात दौऱ्याविषयीच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. या पत्रकार परिषदेनंतर या दोघांनी एक फोटो देखील काढला. हा फोटो बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोला ‘श्रीलंका दौऱ्यासाठीच्या कर्णधार आणि प्रशिक्षकांना भेटा. आम्ही उत्साहित आहोत. तुम्ही आहात का?’, असे कॅप्शन देखील दिले आहे. हा फोटो वेगाने व्हायरल होतो आहे.
Say hello to #TeamIndia's captain & coach for the Sri Lanka tour 👋🤜🤛
We are excited. Are you? 😃#SLvIND pic.twitter.com/OnNMzRX4ZB
— BCCI (@BCCI) June 27, 2021
चाहत्यांनी दिल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया
या फोटोवर चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मिडीयावर सगळीकडे राहुल द्रविडचीच चर्चा होते आहे. अनेक चाहत्यांनी ते या क्षणाची खूप दिवस झाले वाट पाहत होते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एका चाहत्याने प्रतिक्रिया देतांना द्रविडला भारताच्या मुख्य संघाचे प्रशिक्षक करण्याची मागणी केली आहे.
https://twitter.com/kauspet/status/1409130931907022855
Rahul Dravid – Most awaited Coach for the Indian Cricket Team 😍
— Siddharth (@SidKeVichaar) June 27, 2021
The best thing Happened to Indian Cricket!.
The Great Wall of India! Wish he becomes our Head Coach at the earliest!— Nithin (@nithinvija) June 27, 2021
Hello Captan aur Coach Saab !!!
New combo heading #TeamIndia with a young unit raring to go.
Hell yeah we are excited 👍— 𝕬𝖌𝖓𝖊𝖑𝖔 𝕲𝖔𝖓𝖘𝖆𝖑𝖛𝖊𝖘 (@Agnelo_G) June 27, 2021
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया, युजवेंद्र चहल
भारताच्या श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक-
वनडे मालिका:
१३ जुलै – पहिला वनडे सामना
१६ जुलै – दुसरा वनडे सामना
१८ जुलै – तिसरा वनडे सामना
टी२० मालिका:
२१ जुलै – पहिला टी२० सामना
२३ जुलै – दुसरा टी२० सामना
२५ जुलै – तिसरा टी२० सामना
महत्त्वाच्या बातम्या:
काय सांगता! वेस्ट इंडिजचे’हे’ ४ खेळाडू तब्बल ६ वर्षांनी एकत्र खेळले आंतरराष्ट्रीय टी२० सामना
३८ व्या वर्षीही मिताली राजचा दबदबा कायम, इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावत केला ‘हा’ विक्रम