आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलने (आयसीसी) २०२० आणि २०२१ या वर्षात टी२० विश्वचषकाचे आयोजन करण्याची योजना आखली होती. ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक २०२० होणार होते, तर टी२० विश्वचषक २०२१चे यजमानपद भारताकडे सोपवण्यात आले होते. परंतु कोविड-१९ मुळे २०२० सालचा टी२० विश्वचषक २ वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आला. मात्र योजनेनुसार २०२१ साली भारतामध्ये टी२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) जोरदार तयारीला लागले आहे. अशात टी२० विश्वचषकाच्या ठिकाणांची माहिती पुढे येत आहे.
आठ शहरात आयोजले जाणार सामने
बीसीसीआयने टी२० विश्वचषक २०२१ साठी आठ शहरांची यादी तयार केली आहे. यात अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मोहाली, धरमशाला, कलकत्ता आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. परंतु बीसीसीआयच्या या निर्णायामुळे बोर्डाचे काही सदस्य नाराज असल्याचे दिसून आले. या आठ शहरांव्यतिरिक्त अजून काही शहरांचा या यादीत समावेश करण्यात यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. गुरुवारी (२४ डिसेंबर) होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) या मुद्द्यावर विचार विनियम केला जाईल.
इतर शहरांना संधी देण्याची मागणी
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार एका असोसिएशनच्या अध्यक्षांनी म्हटले की, “विश्वचषक सामन्यांचे यजमानपद सांभाळणे ही कोणत्याही शहरासाठी अभिमानाची गोष्ट असते. आमच्याकडे उच्च दर्जाचे स्टेडियम आहे. तसेच सर्व उच्च दर्जाच्या सोई-सुविधाही पुरवल्या जातात. त्यामुळे बीसीसीआयने टी२० विश्वचषक सामन्यांच्या आयोजनासाठी अजून काही शहरांना संधी देण्याचा विचार करावा. भारतातील मोठ्या क्रिकेट सेंटरमध्ये सामन्यांचे आयोजन करण्याच्या निर्णयाबाबत आमचा कसलाही आक्षेप नाही. पण कमीत कमी काही सामने तरी आम्हाला देण्यात यावे.”
महत्त्वाच्या बातम्या-
अजिंक्य रहाणेला दिलासा; मेलबर्नमध्ये भारताचा शानदार रेकॉर्ड, पाहा आकडेवारी
वाढदिवस विशेष: विश्वचषकात भल्याभल्या क्रिकेटर्सला न जमलेला विक्रम करणारी ‘ती’ पहिलीच
स्टीव्ह स्मिथने थोपटली भारतीय फिरकीपटू आर अश्विनची पाठ; म्हणाला…