भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे बहुप्रतीक्षेत बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथा व अतिशय महत्त्वाचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच या सामन्यावर टांगती तलवार लागलेली होती. कठोर कोरोना नियमांमुळे भारतीय संघ ब्रिस्बेन येथे खेळण्यास तयार नव्हता. अखेर भारतीय संघ ब्रिस्बेनला जाण्यास तयार झाला, मात्र तेथे पोहोचल्यानंतर भारतीय संघाला काही प्राथमिक सुविधांचा अभाव जाणवत आहे.
भारतीय संघ वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये खेळाडूंना हाउसकीपिंगची सुविधा उपलब्ध होत नाहीये. यासोबत भारतीय संघातील खेळाडूंना स्वतः टॉयलेट साफ करावे लागत आहे. जिममध्ये जाण्याची परवानगी देण्यात आलेली असून देखील ती जिम आंतरराष्ट्रीय स्तराची नाही. स्विमिंग पूल वापरण्यास देखील बंदी घालण्यात आलेली आहे. या सर्व बाबींसंदर्भात भारतीय टीम मॅनेजमेंटने बीसीसीआय सोबत चर्चा केली असून, बीसीसीआयने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड समोर आपली नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआयच्या नाराजीनंतर अखेर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना पुरेपूर सुविधा देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
भारतीय खेळाडूंच्या मागणीनंतर आता सर्वांना जिम, स्विमिंग पूल व जेवणाच्या गुणवत्तेत वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान मालिकेतील क्रिकेट संदर्भात विचार केला असता सिडनी येथील तिसरा कसोटी सामना अनिर्णित अवस्थेत राहिल्याने दोन्ही संघ मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहेत. आता ब्रिस्बेन येथील निर्णायक कसोटी सामन्याकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिले असून, आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय संघाकडून सर्व भारतीय क्रिकेट रसिकांना उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ मायदेशात मालिका विजय मिळवण्याच्याच हेतूने हा सामना खेळतील.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीसंत विरुद्ध जयस्वालचा हल्लाबोल, एकाच षटकात ठोकल्या ‘इतक्या’ धावा
चर्चा तर झालीच पाहिजे! ३७ चेंडूत शतक करणाऱ्या अझरुद्दीनला मिळाले रोहित, रिषभच्या पंक्तींत स्थान
थोडेथोडके नाही तर तब्बल १७ षटकारांची आतषबाजी करत ‘या’ भारतीय खेळाडूने रचले वर्ल्ड रेकॉर्ड्स






