---Advertisement---

आयपीएल २०२१चे राहिलेले सामने होणार ‘या’ देशात, बीसीसीआयने शनिवारी घेतला निर्णय

On: शनिवार, मे 29, 2021 1:35 PM
MI vs CSK (MS Dhoni and Rohit Sharma)
---Advertisement---

भारतीय क्रिकेट बोर्डाने इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे (आयपीएल २०२१) राहिलेले सामने संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (२९ मे) बीसीसीआयच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पावसाचे दिवस असल्याकारणाने हे सामने युएईत होणार आहेत.

हा निर्णय बोर्डाने बोलवलेल्या विशेष सर्वसाधारण बैठकीत झाला व सर्व सदस्यांनी आयपीएलचे युएईत आयोजन करण्यास होकार दिला. यावेळी बीसीसीआयच्या बैठकीत विश्वचषक आयोजनाबद्दल निर्णय घेण्याबद्दल आयसीसीकडून आणखी वेळही मागण्यात आला आहे.

भारत देशात कोरोनाच्या सावटाखाली आयपीएल २०२१चे आयोजन करण्यात आले होते. परंतु आयपीएलच्या जैव सुरक्षित वातावरणात कोरोनाचा शिरकाव झाला होता. सहभागी क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांमधील कोरोना लागणीचे प्रमाण वाढत चालले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने २९ सामन्यानंतर अनिश्चित काळासाठी उर्वरित हंगाम स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बीसीसीआयसाठी उरलेल्या ३१ सामन्यांचे आयोजन करणे आव्हानात्मक ठरले होते.

परंतु आता त्यांना युएईचा पर्याय मिळाल्याने आयपीएलच्या राहिलेल्या चौदाव्या हंगामाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, युएईत आयपीएल सामने होण्याची ही तिसरी वेळ असणार आहे. सर्वप्रथम २०१४ साली भारतातील लोकसभा निवडणुकींमुळे काही सामने युएईत खेळवण्यात आले होते. त्यानंतर आयपीएल २०२० चा पूर्ण हंगाम युएईत आयोजण्यात आला होता.

युएईत अबु धाबी, शाहजाह आणि दुबई या ३ शहरात क्रिकेट स्टेडियम आहेत. अशात बीसीसीआय आयपीएल २०२१चे उर्वरित सामने एकाच शहरात खेळवते की गतवर्षीप्रमाणे ३ वेगवेगळ्या शहरात आयोजेल, हे पाहावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनी की कोहली, कोण आहे श्रेष्ठ कर्णधार? १८ शतके करणाऱ्या माजी क्रिकेटपटूने दिले उत्तर

भारत कोहलीपेक्षा जास्त ‘या’ व्यक्तीचा संघ, इंग्लंडच्या माजी खेळाडूचे लक्षवेधी भाष्य

पुनरागमन अशक्य! असे ३ क्रिकेटपटू, ज्यांच्यासाठी भारतीय संघाची दारे कायमची झाली बंद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---